मराठी पुस्तके

मराठी पुस्तके

‘मोसाद’ – भल्याभल्यांनाही पुरून उरणारी मूठभर देशाची चिमूटभर गुप्तहेर संस्था

प्रस्तावना सप्टेंबर १९२९ मध्ये अरबांना आपल्या एकतेची ताकद दाखवून देण्यासाठी ज्यू लोक जेरुसलेम मधील प्राचीन हेरोदच्या दुसऱ्या देवळाच्या भिंतीपाशी जमा झाले. दुपारच्या वेळी त्यांनी त्यांची शेमा नावाची विशिष्ट प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. पण काही वेळातच त्यांच्यावर अरबांनी दगडे, फुटक्या बाटल्या आणि दगडे भरलेल्या डब्यांनी जोरदार हल्ला केला. या अनपेक्षित अशा हल्ल्यात कोणीही दगावले नसले तरी Read more

मराठी पुस्तके

साम्यवादाचा फोलपणा दाखवणारे कृश्चेवचे भाषण मोसादला कसे मिळाले?

दुसरे महायुध्द संपले आणि अमेरिका व सोव्हिएत युनियन मध्ये शीत युद्धाला सुरुवात झाली. भिन्न विचारसरणी असलेल्या या दोन्ही महासत्तांमध्ये जग विभागले गेले. अमेरिका अनुसरीत असलेल्या भांडवलशाहीमध्ये कामकरी आणि कष्टकऱ्यांचे शोषण होत असल्याच्या भावनेने सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचारसरणीने अनेकांना वेड लावले होते. जगभरातील या साम्यवादी चळवळीचे नेतृत्व जवळपास तब्बल २५ वर्षे सोव्हिएत युनियनचा अध्यक्ष जोसेफ स्टॅलिनने Read more

मराठी पुस्तके

‘ऑपरेशन थीफ’- मोसादने उधळला सिरियाचा शस्त्रसज्ज होण्याचा डाव

२९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाइनची फाळणी करून इस्रायलच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. अजून अधिकृतरित्या इस्रायलची स्थापना झालेली नसली तरी पॅलेस्टाइनच्या फाळणीमुळे अरब राष्ट्रे संतापली होती. आज ना उद्या इस्रायलची स्थापना झाल्यास शेजारची सर्व अरब राष्ट्रे मिळून इस्रायलवर हल्ला करणार याबद्दल ज्यू नेत्यांच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. त्याकाळी पॅलेस्टाईन मध्ये राहत असलेल्या Read more

मराठी पुस्तके

बोर्डरूम – औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या प्रेरणादायी आणि सुरस कहाण्या

१८९५ साली किंग जिलेटला एकदा दाढी करताना खूप त्रास झाला, तेव्हा त्याच्या डोक्यात दाढीचे ब्लेड्स बनवण्याची कल्पना आली आणि जिलेटचे साम्राज्य उभे राहिले.  डॉ जॉन केलॉग यांच्या निसर्गोपचार केंद्रात एके दिवशी धान्य कुटून केलेल्या लगद्याचा ट्रे रात्रभर तसाच राहिल्याने सकाळी वाळून गेला आणि त्यातूनच कॉर्नफ्लेक्सचा जन्म झाला.  १८८६ मध्ये जॉन पेबरटन या फार्मासिस्टने कोकेन, वाइन, Read more

मराठी पुस्तके

बाजिंद – युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी

दुर्गदुर्गेश्वर रायगड शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू. मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक. याच गडाच्या टकमक टोकावरून अनेक शत्रूंचा आणि गद्दारांचा कडेलोट केला जायचा. टकमक टोक हे नाव ऐकताच गुन्हेगारांची पाचावर धारण बसायची. टकमक टोकाची दहशतच तशी होती. स्वराज्याच्या शत्रूंना जरब बसवणार्‍या या टकमक टोकामुळे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडी या गावासाठी मात्र एक संकट निर्माण केले होते. त्यासाठी Read more

मराठी पुस्तके

गोल्डा मायर – आयुष्यभर इस्राएलच्या कल्याणासाठी झटणारे एक अशांत वादळ

६ ऑक्टोबर १९७३ रोजी इजिप्तच्या नेतृत्वाखाली अरब राष्ट्रांनी इस्राएलवर हल्ला केला. ‘योम किप्पुर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात पहिले दोन दिवस अरबांनी चांगलीच मुसंडी मारत इस्राएलला मागे रेटले. अशा बिकट परिस्थितीत इस्राएलचे संरक्षणमंत्री व माजी सेनानी मोशे दायानही खचून गेले आणि त्यांनी राजीनामा देऊ केला. इस्राएल अशा संकटात असताना आणि दायान सारख्या निधड्या सेनानीनेही हार Read more

मराठी पुस्तके

विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम

महाभारत युद्धानंतर तब्बल ३६ वर्षांनंतर कौरवांची माता गांधारीच्या शापाचा परिणाम दिसू लागला. सर्व यादव वंशीय आपापसात लढू लागले आणि परिणामी भगवान श्रीकृष्ण निर्वंश झाले. श्रीकृष्णाची लाडकी नगरी द्वारावती म्हणजे द्वारकेतही अराजक माजले. द्वारकेजवळील समुद्राची लक्षणेही ठीक दिसत नव्हती आणि तो द्वारकेला गिळंकृत करणार हे स्पष्ट दिसू लागले. श्रीकृष्णाचा पृथ्वीतलावरील मानव अवतार संपण्याचे दिवसही जवळ येऊ Read more

मराठी पुस्तके

१९६२ची नामुष्की – एक न सांगण्याजोगी गोष्ट

१९६२ची नामुष्की – एक न सांगण्याजोगी गोष्ट! एखाद्या देशासाठी, समाजासाठी काही गोष्टी नामुष्कीजनक असतात. पण त्याच देशाच्या भावी पिढीच्या वाट्याला तशीच नामुष्की पुन्हा येऊ नये म्हणून या न सांगण्याजोग्या गोष्टी सुद्धा नाईलाजाने सांगाव्या लागतात. १९६२ मध्ये चीन विरुद्धच्या लढाईत भारताचा झालेला दारुण पराभव ही एक अशीच न सांगण्याजोगी गोष्ट! ही पराभवाची शोकांतिका पुन्हा आपल्या वाट्याला Read more

मराठी पुस्तके

प्रतिपश्चंद्र – विजयनगरच्या खजिन्याची रोमांचक शोधकथा

ई.स १३३६ मध्ये वज्रासारख मन आणि पोलादी मनगट असलेल्या हरीहरराय आणि बुक्कराय या दोन भावांनी गोदावरी पासून ते कावेरी पर्यंत एक साम्राज्य उभे केले. तेच ते ‘विजयनगर साम्राज्य‘! हे साम्राज्य सामर्थ्यशाली आणि संपन्न तर होतेच पण स्थापत्य व शिल्पकलेमध्ये सुद्धा प्रगत होते. पण कालांतराने या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्यावेळी विजयनगर साम्राज्याची अफाट संपत्ती Read more