Latest Posts

पुस्तके - थोडक्यात परिचय

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ‘माझी आत्मकथा’

‘घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक Read more

अनुवादित

‘कॅलिस्टो’ – विलक्षण गुंतागुंत आणि अनपेक्षित घटनांनी भरलेले पुस्तक

कधी कधी मनात एक साधी सरळ योजना आखून त्याप्रमाणे एखादी व्यक्ती वाटचाल करत असताना एखादी साधी घटना त्या व्यक्तीचे आयुष्य अनपेक्षित घटनांनी भरून जाते. या घटना इतक्या भराभर होतात की सावरायला वेळच मिळत नाही. अशाच ओडेल डिफस या अमेरिकन व्यक्तीची कहाणी टोरस्टन क्रोल यांनी लिहिलेल्या ‘कॅलिस्टो’ या पुस्तकात दिली आहे. बावीस वर्षांचा ओडेल अमेरिकन सैन्यात Read more

अनुवादित

‘ऑपरेशन कोह पैमा’ – पाकिस्तानची फसलेली कारगिल मोहिम

ऑपरेशन कोह पैमा “पहिल्या टप्प्यात आपण मुजाहिद्दीन आणि सैन्याला काश्मीरमधील कारगिल येथे घुसवून महत्त्वाच्या शिखरांच्या वर कब्जा करू. हा टप्पा आपण याआधीच पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्यात आपण मुजाहिदीनना (पाक सैन्याला) जम्मू आणि लडाख मध्ये घुसवून तेथे बंडखोरी घडवून आणू. तिसरा टप्पा त्यावेळी चालू होईल ज्यावेळी जम्मू व लडाख मधील बंडखोरीमुळे दबावात येऊन भारत सरकार Read more

अनुवादित

अश्विन सांघी यांनी लिहिलेले ‘चाणक्याचा मंत्र’

ग्रीसचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघालेला असतो आणि आता भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. अशावेळी त्याचा एकजुटीने मुकाबला करायचा सोडून भारतातील गांधार, मगध, कैकेय इत्यादी मोठी राज्ये आपापसात लढण्यात गुंग होती. परकीय शत्रू सीमेवर येऊन ठेपलाय याचे काहीही गांभीर्य त्यांना नव्हते. अशा वेळी त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न चाणक्य करतो. मगध सारख्या बलाढ्य साम्राज्याचा राजा धनानंदला Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

अमेरिका आणि सोविएत संघामधील अंतराळ स्पर्धा

ही कहाणी आहे दोन देशांमध्ये झालेल्या अंतराळ स्पर्धेची. सर्व प्रथम अंतराळात कोण आपले रॉकेट पाठवेल, कोण सर्वप्रथम अंतराळात माणूस पाठवेल इथून चालू असलेली ही स्पर्धा कोण सर्व प्रथम चंद्रावर माणूस उतरवेल इथपर्यंत येऊन पोचली. २० जुलै १९६९ रोजी अपोलो ११ मधून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरल्यावर ही स्पर्धा अमेरिकेने जिंकली असली तरी सोव्हिएत रशियानेही या स्पर्धेत Read more

अनुवादित

रॉबिन कूक यांची ‘क्युअर’ कादंबरी – एक वैद्यकीय थरारकथा

न्यूयॉर्क मधल्या सबवे ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर एका जपानी माणसाचा गुढ मृत्यू होतो. प्रथमदर्शनी तरी हा एक नैसर्गिक मृत्यूच वाटत असतो. किंबहुना त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वाटत राहणे हे काही लोकांच्या भल्याचे असते. पण न्यूयॉर्कच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर लॉरी मॉन्टेगोमरीला मात्र त्या जपानी माणसाच्या मृत्यूमध्ये काहीतरी काळेबोरे वाटत असते. पण तिला तसे सिद्ध करण्यापासून रोखण्यासाठी एक भयानक Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

छत्रपती शिवाजी महाराज – रायरी – गोष्ट शिवभक्तांची

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलतानी अत्याचाराने पिचलेल्या रयतेमध्ये चेतना निर्माण करत रयतेचे स्वराज्य स्थापन केले. पूर्ण भारतात मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला. त्यांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवले, स्वाभिमानाने जगायला शिकवले. त्यांची कृती, त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज आजच्या पिढीला पूर्णपणे समजले आहेत का? शिवजयंतीला धांगडधिंगा करत नाचत मिरवणुका काढणे यातच आजची तरुण पिढी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘अन्न’ – अन्नाभोवती फिरणारा माणसाचा संक्षिप्त इतिहास

‘आज जेवण काय बनवायचं?’ हा जवळपास प्रत्येक गृहिणीला रोज पडणारा प्रश्न. आज विविध पदार्थ बनवण्याची कृती आणि त्याची साधने यांची विपुल उपलब्धता असतानाही आजच्या जमान्यात रोज वरील प्रश्न पडत असेल तर मानवाच्या अगदी सुरुवातीच्या काळात काय परिस्थिती असेल? जिथे सुरुवातीला भटके जीवन जगत शिकार करत आपले पोट भरणाऱ्या माणसाला विश्वातील बहुतांश गोष्टी अज्ञात असताना ‘जेवण’ Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

दुर्ग – गडकिल्ल्यांची माहिती सांगणारे पुस्तक

गडकोट हेच राज्य… गडकोट म्हणजे या राज्याचे मूळ… गडकोट म्हणजे खजिना… गडकोट म्हणजे सैन्याचे बल… गडकोट म्हणजे राजलक्ष्मी… गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थाने… गडकोट म्हणजे सुखनिद्रागार… किंबहुना…… गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षक… अगदी प्राचीन काळापासून कोणत्याही राज्यामध्ये गडकिल्ले अत्यंत महत्त्वाचे स्थान राखून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा याच गडकिल्यांच्या मदतीने बलाढ्य अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. याच Read more

अनुवादित

कालचक्राचे रक्षक – श्वास रोखून ठेवायला लावणारी कादंबरी

जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांच्या अचानकपणे हत्या होत असतात. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरू अत्यंत सराईतपणे कोणताही मागमूस न ठेवता या नेत्यांच्या हत्या करत असतो. मुळात एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरी त्या नेत्यांपर्यंत पोहोचतोच कसा? हेच जगभरातल्या तपास संस्थांना समजत नसते. या सर्व हत्यांचा थेट संबंध भारतातील उत्तराखंड राज्यातल्या एक मिलेशियन लॅब नावाच्या एका Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

अजमल कसाब ला फाशी देण्याची मोहीम -‘ऑपरेशन X’

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबई सह पूर्ण भारत देश हादरला. दहशतीचे हे थैमान सलग चार दिवस सुरू होते. हा हल्ला करणाऱ्या १० पैकी ९ दहशतवादी मारले गेले तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले. सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी अजमल अमीर कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले पण यामध्ये त्यांना Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

Eagles over Bangladesh – भारतीय हवाई दलाचा १९७१ च्या युद्धातील पराक्रम

१६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका मध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख एअर मार्शल एच सी दिवाण यांनी पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए ए के नियाजी (ज्यांनी पाकिस्तान तर्फे आत्मसमर्पणाच्या कागद पत्रावर स्वाक्षरी केली होती) यांना विचारले की तुमच्याकडे अजून काही काळ युद्ध करता येईल इतके सैन्य असताना तुम्ही आत्मसमर्पण Read more

अनुवादित

द किल लिस्ट – अज्ञात दहशतवाद्याचा थरारक शोध

जगातील एका अज्ञात अशा ठिकाणाहून एक दहशतवादी इंटरनेट द्वारे अत्यंत जहरी प्रवचन देऊन तरुणांना दहशतवादी कृत्यासाठी चिथावत असतो. त्या व्यक्तीबद्दल अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांना काहीच माहिती नसते. त्याचे नाव, गाव, चेहरा अगदी काहीच नाही. प्रवचने देत असल्याने त्याला अमेरिकेने ‘द प्रीचर’ हे सांकेतिक नाव ठेवलेले असते आणि हे नाव अमेरिकेच्या ‘द किल लिस्ट’ मध्ये Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

संकट आयसिसचे – अल कायदा पेक्षा ही मोठे संकट

‘हे म्हणजे जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने मेक्सिको मध्ये घुसखोरी केल्यासारखे आहे’. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००३ मध्ये इराक वर हल्ल्याचा निर्णय घेतला तेव्हा एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने वरील शब्दात याला विरोध केला होता. खरेच बोलला तो. अमेरिकेने इराक वर हल्ला करून सद्दाम हुसेनची सत्ता उलथून टाकली. कालांतराने सद्दामला पकडून Read more

मराठी पुस्तके

इस्रायलने कशी केली इराकची अणुभट्टी उद्ध्वस्त? – ऑपरेशन ऑपेरा

ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असलेल्या इस्रायलचे आपल्या शेजारी अरब राष्ट्रांशी कट्टर वैर होते. सर्व अरब राष्ट्रे एकत्र येऊनही इस्रायलचा पराभव करू शकले नव्हते. अशा परिस्थितीत एखादे अरब राष्ट्र अण्वस्त्रसज्ज होणे इस्रायलला अजिबात परवडणारे नव्हते. इस्रायल आकारमानाने इतके छोटे राष्ट्र होते की केवळ एक अणुबॉम्ब सुद्धा इस्रायलला उद्ध्वस्त करण्यास पुरेसा होता. त्यामुळेच इराकने ज्यावेळी अण्वस्त्रे निर्माण करण्याच्या Read more

मराठी पुस्तके

ऑपरेशन नोहाज आर्क – मोसादने फ्रान्समधून पळवल्या मिसाईल बोटी

कोणताही देश आपली सशस्त्र दले सुसज्ज ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लष्करी उपकरणे विकसित करण्याकडे लक्ष देतो. गरज पडल्यास अशा उपकरणांसाठी दुसऱ्या देशांसोबत करार सुद्धा केला जातो. असाच एक करार इस्रायल आणि फ्रान्समध्ये झाला होता. मिसाईल बोटींचा. पण फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष चार्ल्स द गॉल यांनी अचानक हा करार मोडला आणि इस्रायलला मिसाईल बोटी देण्यास नकार दिला. इस्रायलसाठी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

सियालकोट गाथा – लहानपणी ताटातूट झालेल्या दोन भावांची कहाणी

सियालकोट गाथा आहे अरविंद आणि अरबाज या दोन व्यक्तींची ! कलकत्त्यात एका मारवाडी व्यापारी सुखवस्तू कुटुंबातील अरविंद आणि मुंबई मधील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील अरबाज तसे एकमेकांपासून जवळपास २००० किमी अंतरावर आपले जीवन व्यतीत करत होते. पण नियतीने त्यांना वारंवार एकमेकांसमोर उभे केले. इतिहासातील अनेक मुख्य घटनांशी बेमालूमपणे आपले हे कथानक जोडून आश्विन सांघी यांनी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

पेशवाई – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याला आणखी बळकटी आणली. पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर आणि मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे यांची सुटका केल्यानंतर स्वराज्याचा खरा वारसदार कोण यासाठी महाराणी ताराबाई आणि शाहू राजे यांच्यात संघर्ष सुरू झाला. याचीच परिणती अखेर Read more

अनुवादित

द रोझाबल लाईन – एक रहस्यमय धार्मिक कादंबरी

द रोझाबल लाईन हे एक धार्मिक रहस्य लपवून ठेवलेलं ठिकाण. काय होते हे रहस्य? रोमन कॅथलिक चर्च जगभरातील ख्रिश्चन नंबर धर्माचा गाढा प्रभाव कायम राहावा यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी काहीही (अगदी काहीही) करायची त्यांची तयारी असते. तर दुसरीकडे असतात इल्युमिनाटी. मे १७७६ मध्ये जर्मनीतील बव्हेरियात सर्वप्रथम स्थापन झालेला हा गुप्त गट लोकांवरील चर्चचा प्रभाव Read more

मराठी पुस्तके

ऑपरेशन पेनिसिलीन – इराक मधून मिग-२१ लढाऊ विमान पळवून आणण्याची मोसादची मोहीम

ऑपरेशन पेनिसिलीन काय होते? जेव्हा कोणत्याही देशाला त्याच्या आसपास शत्रू राष्ट्रांनी घेरलेले असेल त्यावेळी आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी त्या राष्ट्राला नेहमी दक्ष रहावे लागते. अशीच अवस्था इस्रायलची होती. त्याच्या आसपासची अरब राष्ट्रे इस्रायलचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आकाशपाताळ एक करत होती. अशा वेळी अरब राष्ट्रांमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर मोसाद बारकाईने नजर ठेवून होती. अशातच सोविएत संघाने Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर

मेक्सिको मधील माया लोकांच्या पिरॅमिड मध्ये शिलाखंडावर अग्निबाणातील अंतराळवीर कोरलेला आहे. पेरू देशातील अतिप्राचीन दगडांवर हृदय बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा एक टप्पा दाखवण्यात आला आहे. सुमेरियन लोकांनी अशी एक पंधरा आकडी संख्या लिहून ठेवली आहे जी आजच्या कॉम्प्युटर मध्ये सुद्धा येत नाही. चीन मध्ये भूकंपात सरोवरातून वर आलेल्या पिरॅमिड वर अग्नीबाणांची चित्रे आहेत. इस्टर आयलंड वरील ३३ Read more

मराठी पुस्तके

छत्रपती शिवाजी महाराज – व्यवस्थापन गुरु आणि व्यूहरचनाकार

प्रोजेक्ट अफजलखान – १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेला अफजलखानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यूहरचनात्मक प्रगल्भता आणि उत्तम व्यवस्थापकीय कौशल्याचा नमुना होता.  आग्र्याहून सुटका – छ. शिवाजी महाराजांचे आग्र्याला जाणे, औरंगजेबाच्या कैदेत राहणे आणि तिथून निसटून पुन्हा सुखरूप स्वराज्यात येणे यामध्ये जवळपास आठ महिन्यांचा कालावधी गेला. या काळात शिवराय कोठे आहेत हे कोणालाच माहित Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

बर्म्युडा ट्रँगल – आजपर्यंत न उलगडलेले रहस्य

फ्लाईट लीडर (लेफ्टनंट चार्ल्स टेलर) : Calling Tower, this is an emergency. आम्ही बहुधा मार्ग चुकलोय. आम्हाला जमीन दिसत नाही……पुन्हा सांगतो….आम्हाला जमीन दिसत नाही. Tower : तुमच नेमक स्थान काय आहे? फ्लाईट लीडर : आमच्या नेमक्या स्थानाबद्दल आम्हाला काही खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आम्ही कुठे आहोत हेच आम्हाला कळत नाही…..बहुधा आम्ही वाट चुकलोय. Tower : Read more

मराठी पुस्तके

पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान

पुतिन…. चांगला राजकारणी संधीची वाट पाहत नाही……ती स्वत: तयार करतो. ३१ ऑगस्ट १९९९ रोजी मॉस्को मधील एक मॉल मध्ये हादरवून टाकणार एक स्फोट झाला.. (एकाचा मृत्यू) याच्या काही दिवसांनंतर चेचन्या पासून जवळ असलेल्या बुयांस्क गावात लष्कराचे वरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या इमारतीत बॉम्बस्फोट झाला..(६४ जणांचा मृत्यू) यानंतर चार दिवसांनी (८सप्टेंबर १९९९) मॉस्कोच्या मध्यवर्ती भागातील निवासी संकुलात Read more

अनुवादित

महाभारत युद्ध आणि त्यामधील गूढ शस्त्र

ही कहाणी आहे महाभारतातील एका रहस्यमय अशा शस्त्राची ज्याला कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या मगधाच्या राजाने पांडवांविरुद्ध वापरण्यासाठी बनवले होते. पण हे शस्त्र वापरण्याची वेळच आली नाही. हे रहस्य इतके स्फोटक होते की सम्राट अशोकानेही हे रहस्यमय शस्त्र कधीच जगासमोर येऊ नये याचा काटेकोर बंदोबस्त केला. पण आता वर्तमानकाळात एक पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबा Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

भगतसिंगचा खटला – न्यायाच्या हत्येचे कारस्थान

“जर जर्मनीने अथवा रशियाने इंग्लंडवर आक्रमण केले, तर त्या आक्रमकांना हिंसक प्रतिकार करू नका,’ असा उपदेश लॉर्ड आयर्विन (इंग्लंडच्या) जनतेला करणार आहेत का? जर तसे ते करणार नसतील, तर या खटल्याबद्दलही त्यांनी काही उठाठेव करू नये. पण एक गोष्ट मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो – भगतसिंगची विचारसरणी मला पटो वा न पटो, त्याच्यासारख्या माणसाचे अविचल धैर्य Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘मॅन हंट’ – बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा

११ सप्टेंबर २००१ – सकाळची वेळ – कंदाहार (अफगाणिस्तान) ‘आज बातम्या पाहणं खूप महत्त्वाचं आहे’ असे ओसामा बिन लादेन आपल्या अंगरक्षकाला म्हणाला. २९ एप्रिल २०११ – सकाळची वेळ – व्हाइट हाऊस, अमेरिका “मी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि तो ‘होय’ असा आहे”. ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी ‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’ ला ओबामा यांनी संमती दिली. Read more

अनुवादित

दुसरे महायुद्ध आणि त्यावर आधारित एक महान कादंबरी – HMS युलिसिस

०१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीच्या पोलंड वरील हल्याने दुसरे महायुद्ध सुरू झाले. २२ जून १९४१ रोजी नाझी जर्मनीने ‘ऑपरेशन बार्बारोसा’च्या नावाखाली सोवियत रशियावर हल्ला केला. सुरुवातीच्या काळात जर्मन सैन्याने रशियन सेनेचा पराभव करत चांगलीच मुसंडी मारली. इकडे युरोपमध्येही ब्रिटन वगळता जवळपास संपूर्ण युरोप जर्मनीच्या ताब्यात गेला होता. अशावेळी रशियाला जर्मनी सोबत लढण्यासाठी विमाने, इंधन, दारूगोळा Read more

मराठी पुस्तके

ज्यूंचा कसाई आईकमानला पकडण्याचा थरार – ‘ऑपरेशन अत्तीला’

ती एक व्यक्ती दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंचे शिरकाण करण्याचे नियोजन करत होती. ज्यूंना डांबण्यासाठी पूर्ण नाझी व्याप्त प्रदेशात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या छळ छावण्या आणि त्यांचे व्यवस्थापन याची देखरेख ही एकटी व्यक्ती करायची…..म्हणूनच याला ज्यूंचा कसाई म्हणून ओळखले जायचे.  ती व्यक्ती म्हणजे नाझी सरकारच्या यहुदी विभागाचा प्रमुख असलेला अडोल्फ आईकमान. आईकमान हा गेस्टापोचा म्हणजेच नाझी गुप्त Read more

मराठी पुस्तके

मोसाद चे ‘ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स’- इजिप्तचा शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्प बंद पाडण्याची कहाणी

दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने अग्निबाण निर्मितीच्या क्षेत्रात चांगली प्रगती केली होती. या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला असला तरी जर्मनीच्या v-२ अग्निबाणांनी तर एक वेळ मित्र राष्ट्रांच्या तोंडचे पाणी  पळवले होते. महायुद्धानंतर या कुशल जर्मन शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांना अमेरिका आणि सोविएत रशियाने आपापल्या देशात नेले आणि त्यांच्या मदतीने अग्निबाण व क्षेपणास्त्र बनवायला सुरुवात केली. इस्रायलचा कट्टर शत्रू Read more

मराठी पुस्तके

माओ-त्से-तुंग – चीनी साम्यवादी क्रांतीचे रोमहर्षक चित्र आणि चरित्र

१९९०-९१ मध्ये सोविएत रशिया कोसळल्यानंतर जगभरामध्ये साम्यवादाचा फोलपणा सर्वांच्या समोर आला. मूळात याची सुरुवात १९५६ मध्येच झाली होती ज्यावेळी सोविएत रशियाचा तत्कालीन अध्यक्ष निकिता कृश्चेवने साम्यवादी पक्षाच्या २०व्या अधिवेशनात स्टॅलिनच्या अमानुष कृत्यांचा पाढा जाहीरपणे वाचला. जवळपास तब्बल २५ वर्षे जागतिक साम्यवादी चळवळीचे नेतृत्व केलेल्या स्टॅलिनच्या विरोधातील कृश्चेवचे हे भाषण साम्यवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. सोविएत Read more

मराठी पुस्तके

अपोलो ११ – चंद्रावरील माणसाच्या यशस्वी स्वारीची रोमांचक कहाणी

‘The Egle has landed..’ (ईगल उतरले आहे) अपोलो ११ यानाने पृथ्वीवर पाठवलेला हा संदेश ऐकण्यासाठी समस्त मानवसमाज कित्येक वर्षे धडपडत होता, संघर्ष करत होता. काय होते अपोलो ११ मिशन? अपोलो ११ केवळ एक नाव नाही  अपोलो ११ म्हणजे माणसाच्या जिद्दीचे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक! अपोलो ११ म्हणजे असंख्य अपयशे येऊन सुद्धा खचून न जाता यशासाठी Read more

मराठी पुस्तके

छत्रपती शिवाजी महाराज – जगातले एक ग्रेट इंजीनियर

प्रस्तावना भारतीय राजकारणामध्ये सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग बर्‍याच वेळा केला जातो. काही नेत्यांना या प्रयोगाद्वारे अभूतपूर्व यश मिळाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. पण जवळपास ३९२ वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध क्षेत्रांमध्ये सोशल इंजिनीयरिंगचे यशस्वी प्रयोग केले होते आणि त्यातूनच पुढे सामान्य रयतेच्या सहभागाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. चुकीच्या रूढी-परंपरांना नष्ट करत विविध सण साजरे करणे, विविध Read more

मराठी पुस्तके

‘मोसाद’ – भल्याभल्यांनाही पुरून उरणारी मूठभर देशाची चिमूटभर गुप्तहेर संस्था

प्रस्तावना सप्टेंबर १९२९ मध्ये अरबांना आपल्या एकतेची ताकद दाखवून देण्यासाठी ज्यू लोक जेरुसलेम मधील प्राचीन हेरोदच्या दुसऱ्या देवळाच्या भिंतीपाशी जमा झाले. दुपारच्या वेळी त्यांनी त्यांची शेमा नावाची विशिष्ट प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. पण काही वेळातच त्यांच्यावर अरबांनी दगडे, फुटक्या बाटल्या आणि दगडे भरलेल्या डब्यांनी जोरदार हल्ला केला. या अनपेक्षित अशा हल्ल्यात कोणीही दगावले नसले तरी Read more

मराठी पुस्तके

साम्यवादाचा फोलपणा दाखवणारे कृश्चेवचे भाषण मोसादला कसे मिळाले?

दुसरे महायुध्द संपले आणि अमेरिका व सोव्हिएत युनियन मध्ये शीत युद्धाला सुरुवात झाली. भिन्न विचारसरणी असलेल्या या दोन्ही महासत्तांमध्ये जग विभागले गेले. अमेरिका अनुसरीत असलेल्या भांडवलशाहीमध्ये कामकरी आणि कष्टकऱ्यांचे शोषण होत असल्याच्या भावनेने सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचारसरणीने अनेकांना वेड लावले होते. जगभरातील या साम्यवादी चळवळीचे नेतृत्व जवळपास तब्बल २५ वर्षे सोव्हिएत युनियनचा अध्यक्ष जोसेफ स्टॅलिनने Read more

मराठी पुस्तके

‘ऑपरेशन थीफ’- मोसादने उधळला सिरियाचा शस्त्रसज्ज होण्याचा डाव

२९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाइनची फाळणी करून इस्रायलच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. अजून अधिकृतरित्या इस्रायलची स्थापना झालेली नसली तरी पॅलेस्टाइनच्या फाळणीमुळे अरब राष्ट्रे संतापली होती. आज ना उद्या इस्रायलची स्थापना झाल्यास शेजारची सर्व अरब राष्ट्रे मिळून इस्रायलवर हल्ला करणार याबद्दल ज्यू नेत्यांच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. त्याकाळी पॅलेस्टाईन मध्ये राहत असलेल्या Read more

मराठी पुस्तके

बोर्डरूम – औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या प्रेरणादायी आणि सुरस कहाण्या

१८९५ साली किंग जिलेटला एकदा दाढी करताना खूप त्रास झाला, तेव्हा त्याच्या डोक्यात दाढीचे ब्लेड्स बनवण्याची कल्पना आली आणि जिलेटचे साम्राज्य उभे राहिले.  डॉ जॉन केलॉग यांच्या निसर्गोपचार केंद्रात एके दिवशी धान्य कुटून केलेल्या लगद्याचा ट्रे रात्रभर तसाच राहिल्याने सकाळी वाळून गेला आणि त्यातूनच कॉर्नफ्लेक्सचा जन्म झाला.  १८८६ मध्ये जॉन पेबरटन या फार्मासिस्टने कोकेन, वाइन, Read more

अनुवादित

‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ चे गूढ – दहशतवाद्यांनी भारताविरोधात रचलेला एक भयानक कट

नवी दिल्ली जवळील नोएडा मधील निर्मनुष्य अशा गोल्फ रोड वर CISF च्या Addl Inspector General (AIG) च्या गाडीचा एका ट्रक सोबत अपघात होतो. हा अपघात नसून घातपात आहे याची जाणीव झालेल्या AIG नी आपल्या त्या रक्तबंबाळ अवस्थेतच आपल्या पत्नीला फोन लावला. त्यांनी पत्नीला सांगितले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ‘ट्यूपॅक II’ ला प्रारंभ केलाय आणि ही गोष्ट Read more

मराठी पुस्तके

बाजिंद – युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी

दुर्गदुर्गेश्वर रायगड शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू. मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक. याच गडाच्या टकमक टोकावरून अनेक शत्रूंचा आणि गद्दारांचा कडेलोट केला जायचा. टकमक टोक हे नाव ऐकताच गुन्हेगारांची पाचावर धारण बसायची. टकमक टोकाची दहशतच तशी होती. स्वराज्याच्या शत्रूंना जरब बसवणार्‍या या टकमक टोकामुळे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडी या गावासाठी मात्र एक संकट निर्माण केले होते. त्यासाठी Read more

मराठी पुस्तके

गोल्डा मायर – आयुष्यभर इस्राएलच्या कल्याणासाठी झटणारे एक अशांत वादळ

६ ऑक्टोबर १९७३ रोजी इजिप्तच्या नेतृत्वाखाली अरब राष्ट्रांनी इस्राएलवर हल्ला केला. ‘योम किप्पुर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात पहिले दोन दिवस अरबांनी चांगलीच मुसंडी मारत इस्राएलला मागे रेटले. अशा बिकट परिस्थितीत इस्राएलचे संरक्षणमंत्री व माजी सेनानी मोशे दायानही खचून गेले आणि त्यांनी राजीनामा देऊ केला. इस्राएल अशा संकटात असताना आणि दायान सारख्या निधड्या सेनानीनेही हार Read more

अनुवादित

हडप्पा संस्कृती चे वर्षानुवर्षे जपलेले एक रहस्य – रक्तधारेचा अभिशाप

राग, लोभ, इर्ष्या, मत्सर हे मानवी स्वभावाचे महत्वाचे पैलू आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात हे गुण असतातच. पण चांगल्या गुणांपेक्षा ज्यावेळी अवगुण हे जास्त प्रभावी होऊ लागतात त्यावेळी कोणताही मनुष्य सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसतो आणि मग त्याचे आणि त्या समाजाचे अध:पतन निश्चित असते. ई.स पूर्व १७००च्या सुमारास त्याकाळी भारतातील (आणि कदाचित जगातील काही Read more

मराठी पुस्तके

विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम

महाभारत युद्धानंतर तब्बल ३६ वर्षांनंतर कौरवांची माता गांधारीच्या शापाचा परिणाम दिसू लागला. सर्व यादव वंशीय आपापसात लढू लागले आणि परिणामी भगवान श्रीकृष्ण निर्वंश झाले. श्रीकृष्णाची लाडकी नगरी द्वारावती म्हणजे द्वारकेतही अराजक माजले. द्वारकेजवळील समुद्राची लक्षणेही ठीक दिसत नव्हती आणि तो द्वारकेला गिळंकृत करणार हे स्पष्ट दिसू लागले. श्रीकृष्णाचा पृथ्वीतलावरील मानव अवतार संपण्याचे दिवसही जवळ येऊ Read more

अनुवादित

भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास – माझेही एक स्वप्न होते

आतापर्यंत जगातले बहुतांश महत्त्वाचे शोध हे अपघाताने लागल्याचे इतिहासात डोकावून पाहताना आपल्याला समजून येईल. पण एखादी ‘अपघाती घटना’ भारतातील दुग्ध व्यवसायाचा चेहरामोहरा बदलून भारताला दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण बनवून त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यास कारणीभूत ठरली असे सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे पूर्णपणे सत्य आहे. ग्रामीण भारताशी काहीही सोयसुतक नसलेला वर्गीस कुरियन नावाचा Read more

अनुवादित

Your Prime Minister is Dead – लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्युचे रहस्य

‘जय जवान जय किसान’ ची घोषणा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे आकस्मिक निधन झाले. १९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता करार करण्यासाठी ते तत्कालीन सोव्हिएत युनियन मधील ताश्कंद येथे गेले होते. सात दिवस अखंड चाललेल्या वाटाघाटी नंतर अखेर १० जानेवारी रोजी ताश्कंद करारावर भारत आणि Read more

अनुवादित

द कृष्णा की – भगवान कृष्णाच्या अमूल्य ठेव्याचे प्राचीन रहस्य

महाभारत खरोखर घडले होते का? की ते एक काल्पनिक महाकाव्य होते? श्री कृष्ण ही काल्पनिक व्यक्तिरेखा होती की प्रत्यक्षात त्याचे अस्तित्व होते? जर श्री कृष्ण प्रत्यक्षात होते तर त्याचे अस्तित्व पौराणिक होते की ऐतिहासिक? लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारा स्यमंतक मणी जादुई होता की त्या मागे काही वैज्ञानिक कारण होते? अण्वस्त्रांचा शोध प्रथम रॉबर्ट ओपेनहायमर ने Read more

स्पाय प्रिन्सेस - जॉर्ज क्रॉस विजेती भारताची महिला गुप्तहेर
अनुवादित

स्पाय प्रिन्सेस – जॉर्ज क्रॉस विजेती भारताची महिला गुप्तहेर

ती माताहारी सारखी फार मोठी गुप्तहेर नव्हती पण तीने दुसर्‍या महायुद्धात जे काही हेरगिरीचे कार्य पार पाडले तेसुद्धा उल्लेखनीय होते. तिच्या या कामगिरीने दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशांना जर्मनी विरूद्ध बहुमोल माहिती मिळत गेली. तिच्या या कामगिरीबद्दल तिला जॉर्ज क्रॉस हा ब्रिटिश सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देण्यात आला. गंमत म्हणजे तिचे वडील भारतीय होते आणि आई अमेरिकन Read more

मराठी पुस्तके

१९६२ची नामुष्की – एक न सांगण्याजोगी गोष्ट

१९६२ची नामुष्की – एक न सांगण्याजोगी गोष्ट! एखाद्या देशासाठी, समाजासाठी काही गोष्टी नामुष्कीजनक असतात. पण त्याच देशाच्या भावी पिढीच्या वाट्याला तशीच नामुष्की पुन्हा येऊ नये म्हणून या न सांगण्याजोग्या गोष्टी सुद्धा नाईलाजाने सांगाव्या लागतात. १९६२ मध्ये चीन विरुद्धच्या लढाईत भारताचा झालेला दारुण पराभव ही एक अशीच न सांगण्याजोगी गोष्ट! ही पराभवाची शोकांतिका पुन्हा आपल्या वाट्याला Read more

अनुवादित

१९४५ मध्ये नेमके काय झाले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रहस्य

१८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान मधील सायगाव येथे झालेल्या कथित विमान अपघातात झालेला नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू हे आजपर्यंतचे भारतातील कदाचित सर्वात मोठे रहस्य असावे. १९४५ मध्ये नेमके काय झाले? या रहस्याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत भारत सरकारने तीन वेगवेगळ्या समित्या स्थापूनही हे रहस्य अजूनही उलगडता आलेले नाही. नेताजींच्या या रहस्याबाबत सत्य शोधून काढण्याची Read more

अनुवादित

चरित्र विश्लेषण – गांधी VS जिन्ना – अंतिम भाग

गांधीजी आणि जिन्ना हे जवळपास ४० वर्षे भारतीय राजकारणात होते. या दरम्यान ते हजारो लोकांच्या संपर्कात आले. याच हजारो लोकांच्या साक्षी आणि आठवणींमधून प्रामुख्याने या दोघांचे जीवन चरित्र उलगडत जाते. गांधीजींचे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांशी चांगले संबंध असल्याने आज गांधीजींविषयी बरीच माहिती आणि लिखाण उपलब्ध आहे. जिन्ना मात्र थोडे आत्ममग्न स्वभावाचे असल्याने त्यांचे फारसे मित्र Read more

अनुवादित

कॅबिनेट मिशन, प्रत्यक्ष कृती दिन आणि भारताची फाळणी – गांधी VS जिन्ना – भाग ०६

दुसर्‍या महायुद्धामुळे भारतात ब्रिटिशांची दडपशाही वाढली. अन्नधान्याच्या किंमती अवास्तव वाढल्या आणि काही भागात तर दुष्काळ ही पडला. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध जिंकले. पण या विजयानंतर भारताच्या भवितव्याबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले. ब्रिटिश अजून किती काळ भारताला आपल्या ताब्यात ठेवतील आणि ब्रिटिश निघून गेल्यानंतर भारताचे भवितव्य कसे असेल हे स्पष्ट नव्हते. गांधी vs जिन्ना Read more

अनुवादित

दुसरे महायुद्ध, क्रिप्स मिशन – गांधी VS जिन्ना – भाग – ०५

१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटिश सरकारने हे युद्ध जिंकण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. ब्रिटिशांनी कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या त्यांच्या विरोधकांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. या युद्ध काळात सनदशीर मार्गाने स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे हे कॉंग्रेसला माहित होते. म्हणून कॉंग्रेस ने आक्रमक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला. त्यानूसार Read more

अनुवादित

गांधी VS जिन्ना – दांडी यात्रा, सविनय कायदेभंग, पाकिस्तानची संकल्पना- भाग-०४

नवीन दशकाला सुरुवात झाली त्यावेळी जिन्नांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले होते आणि राजकीय आयुष्यात ते एकटे होते. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी चालू असलेले त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरत होते. जिन्ना यांच्या तुलनेत पंजाब, बंगाल इत्यादी ठिकाणचे प्रांतिक मुस्लिम नेते प्रबळ होते आणि त्यांना एकूण मुस्लिम समाजाच्या हितापेक्षा आपल्या प्रांतातील आपला प्रभाव व सत्तेची चिंता जास्त होती. या Read more

अनुवादित

गांधी VS जिन्ना – भाग ०३ – असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ इत्यादी

गांधी VS जिन्ना याच्या आजच्या भाग ०३ मध्ये वाचा असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ इत्यादी अनेक घडामोडींमध्ये या दोघांच्या भूमिका. १९१९ मध्ये गांधी आणि जिन्ना यांच्यात कॉंग्रेसचे नेतृत्व आणि संघटनेचे स्वरूप या बाबींवर सुप्त संघर्ष सुरू झाला होता. त्याकाळी मुस्लिम लीग चे नेते प्रामुख्याने प्रादेशिक पातळीवरील राजकारणात उत्सुक होते. त्यामुळे कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर मुस्लिम लीग शिवाय Read more

अनुवादित

गांधी VS जिन्ना – भाग – ०२ – भारतीय राजकारणातील आगमन

१९००व्या शतकाच्या सुरूवातीला भारतातील ब्रिटिश सत्तेत व्हाईसरॉय हे सर्वोच्च होते. त्यांच्या हाताखाली विविध राज्य आणि स्थानिक पातळीवरील कायदेमंडळाद्वारे सत्ता राबवली जायची. केवळ स्थानिक पातळीवर होणार्‍या थोड्याफार निवडणुका वगळल्या तर या सर्व व्यवस्थेमध्ये उच्च पातळीवर लोकांचे प्रतिनिधित्व करणारे कोणीही नव्हते. ब्रिटिशांच्या या व्यवस्थेबाहेर असलेल्या भागांमध्ये संस्थानिक आणि राजे-महाराजांचे राज्य होते. हे राजे-महाराजे आपापल्या संस्थानाचे व्यवहार पाहण्यास Read more

अनुवादित

गांधी vs जिन्ना – भाग १ – राजकीय जडणघडण

१९व्या शतकात दोन सुशिक्षित वकिलांनी दक्षिण आशियाच्या इतिहास, भूगोल आणि भविष्य सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. एक होते मोहम्मद अली जिन्ना , ज्यांच्या हट्टाहासामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि दुसरे होते मोहनदास करमचंद गांधी, ज्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करताना भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक चळवळ चालवली. एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले हे दोघे एकमेकांचे विरोधक कसे बनले? एक धर्मनिरपेक्ष Read more

अनुवादित

अफगाणिस्तान – साम्राज्यांचे आणि महासत्तांचे कब्रस्तान?

अफगाणिस्तानला ‘साम्राज्यांचे कब्रस्तान’ म्हटले जाते. आजपर्यंत कोणत्याही साम्राज्य अथवा महासत्तेला अफगाणिस्तान मध्ये विजयी होता आलेले नाही. इथे ‘विजयी होणे’ याची व्याख्या प्रत्येक देशाची वेगवेगळी असू शकते. पण ऐतिहासिक सत्य हेच आहे की अफगाणिस्तानमध्ये बडे बडे देश निर्भेळ यश मिळवू शकलेले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटनने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यात यश आले Read more

मराठी पुस्तके

प्रतिपश्चंद्र – विजयनगरच्या खजिन्याची रोमांचक शोधकथा

ई.स १३३६ मध्ये वज्रासारख मन आणि पोलादी मनगट असलेल्या हरीहरराय आणि बुक्कराय या दोन भावांनी गोदावरी पासून ते कावेरी पर्यंत एक साम्राज्य उभे केले. तेच ते ‘विजयनगर साम्राज्य‘! हे साम्राज्य सामर्थ्यशाली आणि संपन्न तर होतेच पण स्थापत्य व शिल्पकलेमध्ये सुद्धा प्रगत होते. पण कालांतराने या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्यावेळी विजयनगर साम्राज्याची अफाट संपत्ती Read more

अनुवादित

आयसी८१४ विमानाच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती

दोन व्यक्ती विमानातून धावत आल्या. “ते ओरडत होते, ‘खाली झुका, खाली झुका’” थरथर कापत सुभाष कुमार त्या घटना आठवत होते. अपहरणकर्त्यांच्या या मागणीवर बर्‍याच प्रवाश्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि म्हणून अपहरणकर्त्यांनी अशा सर्व प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच विमानावर अपहरणकर्त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवला. आयसी८१४ या इंडियन एयरलाइन्सच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य Read more

अनुवादित

हिमालयन ब्लंडर – चीन विरूद्धच्या पराभवाची 6 मुख्य कारणे

प्रस्तावना कोणत्याही नवस्वतंत्र देशासमोर आपले प्राधान्यक्रम ठरवण्याचे फार मोठे आव्हान असते. तो देश जर भारतासारखा अविकसित आणि विविधतेने भरलेला असेल तर हे आव्हान अधिकच गुंतागुंतीचे बनून जाते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर हाच प्रश्न होता. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सशस्त्र दले आणि निमलष्करी दलांना मजबूत करणे अथवा Read more

अनुवादित

‘𝐀 𝐂𝐚𝐥𝐥 𝐭𝐨 𝐇𝐨𝐧𝐨𝐮𝐫’- उगवत्या भारताच्या जयजयकाराची वेळ?

१९९८ ते २००४ पर्यंत केंद्रामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते आणि पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी. वाजपेयींनी तर या काळात तब्बल तीनवेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. रालोआ सरकारची ही जवळपास सहा वर्षे भारताच्या आणि जगाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण घडामोडींनी भरलेली आहेत. या घडामोडी अशा होत्या की ज्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनेक प्रस्थापित समजूती मोडीत Read more

अनुवादित

आयएसआय आणि रॉ ने संयुक्तपणे लिहिलेले पुस्तक

प्रस्तावना ‘आम्ही दोघांनी मिळून काल्पनिक गोष्टी जरी लिहिल्या, तर त्यावर सुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही.” ‘The Spy Chronicles: RAW, ISI and the Illusion of Peace’ हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना समोर आली तेव्हा पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय चे माजी प्रमुख जन. असद दुर्राणी यांनी वरील प्रतिक्रिया दिली. खरेच आयएसआय आणि भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’ यांचे माजी Read more

अनुवादित

‘ओडेसा फाइल’-जर्मन नाझी अधिकार्‍याची थरारक शोधकथा

स्वत:ला देशभक्त म्हणवणार्‍या व्यक्ती वा संघटनांना आपल्या देशभक्तीचे पुरावे देण्यासाठी कोणतेही अमानुष कृत्ये करण्याची गरज नसते. असे लोक व संघटना संकटाच्या समयी आपल्या देशवासीयांना एकाकी सोडून पळून जात नाहीत. परंतू हाच प्रकार जर्मनी मध्ये दुसर्‍या महायुद्धानंतर घडला आणि ज्यूं वर अनन्वित अत्याचार करणारे नाझी हे कृत्य देशासाठी केल्याचे लंगडे समर्थन करत लपून छपून आपली कारवाई Read more

अनुवादित

पहिले काश्मीर युद्ध आणि भारतीय हवाईदल

प्रस्तावना ०५ ऑगस्ट २०१९, जम्मू-कश्मीर च्या इतिहासातील एक महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस! तसा या राज्याच्या इतिहासात असे अनेक महत्वाचे दिवस खच्चून भरले आहेत, पण या दिवसाचे महत्व खचितच वेगळे. जम्मू-काश्मीरला वेगळी ओळख देणारे भारतीय संविधांनातील कलम ३७० भारत सरकारने हटवले आणि खर्‍या अर्थाने जम्मू-कश्मीरचे भारतात एकीकरण झाले. हे कलम ३७० आहे काय?काश्मीर समस्या काय आहे? Read more