Author: gajananharalikar

पुस्तके - थोडक्यात परिचय

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ‘माझी आत्मकथा’

‘घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक Read more

अनुवादित

‘कॅलिस्टो’ – विलक्षण गुंतागुंत आणि अनपेक्षित घटनांनी भरलेले पुस्तक

कधी कधी मनात एक साधी सरळ योजना आखून त्याप्रमाणे एखादी व्यक्ती वाटचाल करत असताना एखादी साधी घटना त्या व्यक्तीचे आयुष्य अनपेक्षित घटनांनी भरून जाते. या घटना इतक्या भराभर होतात की सावरायला वेळच मिळत नाही. अशाच ओडेल डिफस या अमेरिकन व्यक्तीची कहाणी टोरस्टन क्रोल यांनी लिहिलेल्या ‘कॅलिस्टो’ या पुस्तकात दिली आहे. बावीस वर्षांचा ओडेल अमेरिकन सैन्यात Read more

अनुवादित

‘ऑपरेशन कोह पैमा’ – पाकिस्तानची फसलेली कारगिल मोहिम

ऑपरेशन कोह पैमा “पहिल्या टप्प्यात आपण मुजाहिद्दीन आणि सैन्याला काश्मीरमधील कारगिल येथे घुसवून महत्त्वाच्या शिखरांच्या वर कब्जा करू. हा टप्पा आपण याआधीच पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्यात आपण मुजाहिदीनना (पाक सैन्याला) जम्मू आणि लडाख मध्ये घुसवून तेथे बंडखोरी घडवून आणू. तिसरा टप्पा त्यावेळी चालू होईल ज्यावेळी जम्मू व लडाख मधील बंडखोरीमुळे दबावात येऊन भारत सरकार Read more

अनुवादित

अश्विन सांघी यांनी लिहिलेले ‘चाणक्याचा मंत्र’

ग्रीसचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघालेला असतो आणि आता भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. अशावेळी त्याचा एकजुटीने मुकाबला करायचा सोडून भारतातील गांधार, मगध, कैकेय इत्यादी मोठी राज्ये आपापसात लढण्यात गुंग होती. परकीय शत्रू सीमेवर येऊन ठेपलाय याचे काहीही गांभीर्य त्यांना नव्हते. अशा वेळी त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न चाणक्य करतो. मगध सारख्या बलाढ्य साम्राज्याचा राजा धनानंदला Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

अमेरिका आणि सोविएत संघामधील अंतराळ स्पर्धा

ही कहाणी आहे दोन देशांमध्ये झालेल्या अंतराळ स्पर्धेची. सर्व प्रथम अंतराळात कोण आपले रॉकेट पाठवेल, कोण सर्वप्रथम अंतराळात माणूस पाठवेल इथून चालू असलेली ही स्पर्धा कोण सर्व प्रथम चंद्रावर माणूस उतरवेल इथपर्यंत येऊन पोचली. २० जुलै १९६९ रोजी अपोलो ११ मधून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरल्यावर ही स्पर्धा अमेरिकेने जिंकली असली तरी सोव्हिएत रशियानेही या स्पर्धेत Read more

अनुवादित

रॉबिन कूक यांची ‘क्युअर’ कादंबरी – एक वैद्यकीय थरारकथा

न्यूयॉर्क मधल्या सबवे ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर एका जपानी माणसाचा गुढ मृत्यू होतो. प्रथमदर्शनी तरी हा एक नैसर्गिक मृत्यूच वाटत असतो. किंबहुना त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वाटत राहणे हे काही लोकांच्या भल्याचे असते. पण न्यूयॉर्कच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर लॉरी मॉन्टेगोमरीला मात्र त्या जपानी माणसाच्या मृत्यूमध्ये काहीतरी काळेबोरे वाटत असते. पण तिला तसे सिद्ध करण्यापासून रोखण्यासाठी एक भयानक Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

छत्रपती शिवाजी महाराज – रायरी – गोष्ट शिवभक्तांची

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलतानी अत्याचाराने पिचलेल्या रयतेमध्ये चेतना निर्माण करत रयतेचे स्वराज्य स्थापन केले. पूर्ण भारतात मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला. त्यांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवले, स्वाभिमानाने जगायला शिकवले. त्यांची कृती, त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज आजच्या पिढीला पूर्णपणे समजले आहेत का? शिवजयंतीला धांगडधिंगा करत नाचत मिरवणुका काढणे यातच आजची तरुण पिढी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘अन्न’ – अन्नाभोवती फिरणारा माणसाचा संक्षिप्त इतिहास

‘आज जेवण काय बनवायचं?’ हा जवळपास प्रत्येक गृहिणीला रोज पडणारा प्रश्न. आज विविध पदार्थ बनवण्याची कृती आणि त्याची साधने यांची विपुल उपलब्धता असतानाही आजच्या जमान्यात रोज वरील प्रश्न पडत असेल तर मानवाच्या अगदी सुरुवातीच्या काळात काय परिस्थिती असेल? जिथे सुरुवातीला भटके जीवन जगत शिकार करत आपले पोट भरणाऱ्या माणसाला विश्वातील बहुतांश गोष्टी अज्ञात असताना ‘जेवण’ Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

दुर्ग – गडकिल्ल्यांची माहिती सांगणारे पुस्तक

गडकोट हेच राज्य… गडकोट म्हणजे या राज्याचे मूळ… गडकोट म्हणजे खजिना… गडकोट म्हणजे सैन्याचे बल… गडकोट म्हणजे राजलक्ष्मी… गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थाने… गडकोट म्हणजे सुखनिद्रागार… किंबहुना…… गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षक… अगदी प्राचीन काळापासून कोणत्याही राज्यामध्ये गडकिल्ले अत्यंत महत्त्वाचे स्थान राखून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा याच गडकिल्यांच्या मदतीने बलाढ्य अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. याच Read more

अनुवादित

कालचक्राचे रक्षक – श्वास रोखून ठेवायला लावणारी कादंबरी

जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांच्या अचानकपणे हत्या होत असतात. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरू अत्यंत सराईतपणे कोणताही मागमूस न ठेवता या नेत्यांच्या हत्या करत असतो. मुळात एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरी त्या नेत्यांपर्यंत पोहोचतोच कसा? हेच जगभरातल्या तपास संस्थांना समजत नसते. या सर्व हत्यांचा थेट संबंध भारतातील उत्तराखंड राज्यातल्या एक मिलेशियन लॅब नावाच्या एका Read more