Author: gajananharalikar

पुस्तके - थोडक्यात परिचय

Eagles over Bangladesh – भारतीय हवाई दलाचा १९७१ च्या युद्धातील पराक्रम

१६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका मध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख एअर मार्शल एच सी दिवाण यांनी पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए ए के नियाजी (ज्यांनी पाकिस्तान तर्फे आत्मसमर्पणाच्या कागद पत्रावर स्वाक्षरी केली होती) यांना विचारले की तुमच्याकडे अजून काही काळ युद्ध करता येईल इतके सैन्य असताना तुम्ही आत्मसमर्पण Read more

अनुवादित

द किल लिस्ट – अज्ञात दहशतवाद्याचा थरारक शोध

जगातील एका अज्ञात अशा ठिकाणाहून एक दहशतवादी इंटरनेट द्वारे अत्यंत जहरी प्रवचन देऊन तरुणांना दहशतवादी कृत्यासाठी चिथावत असतो. त्या व्यक्तीबद्दल अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांना काहीच माहिती नसते. त्याचे नाव, गाव, चेहरा अगदी काहीच नाही. प्रवचने देत असल्याने त्याला अमेरिकेने ‘द प्रीचर’ हे सांकेतिक नाव ठेवलेले असते आणि हे नाव अमेरिकेच्या ‘द किल लिस्ट’ मध्ये Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

संकट आयसिसचे – अल कायदा पेक्षा ही मोठे संकट

‘हे म्हणजे जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने मेक्सिको मध्ये घुसखोरी केल्यासारखे आहे’. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००३ मध्ये इराक वर हल्ल्याचा निर्णय घेतला तेव्हा एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने वरील शब्दात याला विरोध केला होता. खरेच बोलला तो. अमेरिकेने इराक वर हल्ला करून सद्दाम हुसेनची सत्ता उलथून टाकली. कालांतराने सद्दामला पकडून Read more

मराठी पुस्तके

इस्रायलने कशी केली इराकची अणुभट्टी उद्ध्वस्त? – ऑपरेशन ऑपेरा

ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असलेल्या इस्रायलचे आपल्या शेजारी अरब राष्ट्रांशी कट्टर वैर होते. सर्व अरब राष्ट्रे एकत्र येऊनही इस्रायलचा पराभव करू शकले नव्हते. अशा परिस्थितीत एखादे अरब राष्ट्र अण्वस्त्रसज्ज होणे इस्रायलला अजिबात परवडणारे नव्हते. इस्रायल आकारमानाने इतके छोटे राष्ट्र होते की केवळ एक अणुबॉम्ब सुद्धा इस्रायलला उद्ध्वस्त करण्यास पुरेसा होता. त्यामुळेच इराकने ज्यावेळी अण्वस्त्रे निर्माण करण्याच्या Read more

मराठी पुस्तके

ऑपरेशन नोहाज आर्क – मोसादने फ्रान्समधून पळवल्या मिसाईल बोटी

कोणताही देश आपली सशस्त्र दले सुसज्ज ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लष्करी उपकरणे विकसित करण्याकडे लक्ष देतो. गरज पडल्यास अशा उपकरणांसाठी दुसऱ्या देशांसोबत करार सुद्धा केला जातो. असाच एक करार इस्रायल आणि फ्रान्समध्ये झाला होता. मिसाईल बोटींचा. पण फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष चार्ल्स द गॉल यांनी अचानक हा करार मोडला आणि इस्रायलला मिसाईल बोटी देण्यास नकार दिला. इस्रायलसाठी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

सियालकोट गाथा – लहानपणी ताटातूट झालेल्या दोन भावांची कहाणी

सियालकोट गाथा आहे अरविंद आणि अरबाज या दोन व्यक्तींची ! कलकत्त्यात एका मारवाडी व्यापारी सुखवस्तू कुटुंबातील अरविंद आणि मुंबई मधील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील अरबाज तसे एकमेकांपासून जवळपास २००० किमी अंतरावर आपले जीवन व्यतीत करत होते. पण नियतीने त्यांना वारंवार एकमेकांसमोर उभे केले. इतिहासातील अनेक मुख्य घटनांशी बेमालूमपणे आपले हे कथानक जोडून आश्विन सांघी यांनी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

पेशवाई – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याला आणखी बळकटी आणली. पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर आणि मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे यांची सुटका केल्यानंतर स्वराज्याचा खरा वारसदार कोण यासाठी महाराणी ताराबाई आणि शाहू राजे यांच्यात संघर्ष सुरू झाला. याचीच परिणती अखेर Read more

अनुवादित

द रोझाबल लाईन – एक रहस्यमय धार्मिक कादंबरी

द रोझाबल लाईन हे एक धार्मिक रहस्य लपवून ठेवलेलं ठिकाण. काय होते हे रहस्य? रोमन कॅथलिक चर्च जगभरातील ख्रिश्चन नंबर धर्माचा गाढा प्रभाव कायम राहावा यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी काहीही (अगदी काहीही) करायची त्यांची तयारी असते. तर दुसरीकडे असतात इल्युमिनाटी. मे १७७६ मध्ये जर्मनीतील बव्हेरियात सर्वप्रथम स्थापन झालेला हा गुप्त गट लोकांवरील चर्चचा प्रभाव Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

हेरगिरीचे विश्व हे जितके रोमांचक तितकेच धोकादायक! आपल्या देशासाठी परकीय मुलुखात हेरगिरी करताना जर पकडले गेले तर कोणतीही मदत न मिळता थेट मृत्यू. हे माहित असूनही हजारो गुप्तहेर आपले जीव धोक्यात घालून देशासाठी काम करत असतात. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा एक अशाच प्रकारचे गुप्तहेर. शत्रू प्रदेशात ओळख लपवून राहत माहिती Read more

मराठी पुस्तके

ऑपरेशन पेनिसिलीन – इराक मधून मिग-२१ लढाऊ विमान पळवून आणण्याची मोसादची मोहीम

ऑपरेशन पेनिसिलीन काय होते? जेव्हा कोणत्याही देशाला त्याच्या आसपास शत्रू राष्ट्रांनी घेरलेले असेल त्यावेळी आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी त्या राष्ट्राला नेहमी दक्ष रहावे लागते. अशीच अवस्था इस्रायलची होती. त्याच्या आसपासची अरब राष्ट्रे इस्रायलचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आकाशपाताळ एक करत होती. अशा वेळी अरब राष्ट्रांमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर मोसाद बारकाईने नजर ठेवून होती. अशातच सोविएत संघाने Read more