Latest Posts

पुस्तके - थोडक्यात परिचय

आगळेवेगळे प्रवासवर्णन – ‘केल्याने देशाटन’

प्रवास करायला जवळपास सर्वांनाच आवडते तसेच प्रवास वर्णन पर पुस्तके वाचायला सुद्धा. मराठीमध्ये सुद्धा अनेक लेखकांनी आपल्या प्रवास वर्णनाची पुस्तके लिहून ठेवलेली आहेत. पण या सर्वांपेक्षा हटके आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्री चंद्रशेखर टिळक यांनी त्यांनी केलेल्या विविध ठिकाणच्या प्रवासांचे वर्णन आपल्या ‘केल्याने देशाटन’ या पुस्तकात केले आहे. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने श्री चंद्रशेखर टिळक हे महिन्यातील Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

कोण होते सिंधू लोक?

कोण होते सिंधू लोक? सिंधू लोकं कोण होते? सिंधू लोकं हेच आर्य होते का? १९२०-२१ दरम्यान हडप्पा आणि मोहोंजोदारो यांच्या उत्खननातून सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यापासून या वरील प्रश्नांचे नेमके उत्तर आजपर्यंत सापडलेले नाही. सिंधू संस्कृती वैभवशाली आणि अत्यंत प्रगत होती यात शंकाच नाही. पण मग तिचा नाश का व कसा झाला? त्याला आर्य जबाबदार होते Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे थोडक्यात जीवनचरित्र

‘लोकांनी घातलेला बहिष्कार अण्णांनी स्थितप्रज्ञ वृत्तीने सहन केला. बंदुकीची गोळी कापसाच्या गठडीवर मारली, तर तिची तीव्रता कमी होते. अण्णा त्यावेळी कापूस झाले होते’ ‘एक व्यक्ती आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त जे करू शकेल त्याहून अधिक कार्य कर्वे यांनी केले आहे.’ ‘भारताच्या पंतप्रधानांसमोर संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करून अण्णांनी आपल्या १०० वर्षांच्या जीवन मंदिरावर सुवर्ण कळसच चढवला आहे.’ Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सह्याद्रीतील घाट वाटांची माहिती देणारे पुस्तक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाने पवित्र झालेल्या महाराष्ट्राच्या भूमी साठी सह्याद्री एकप्रकारे वरदानच आहे. याच सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उभे असलेल्या असंख्य गड किल्ल्यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य असे हिंदवी स्वराज्य उभे केले. पण या गड किल्ल्यांसोबतच महत्त्वाच्या होत्या त्या म्हणजे सह्याद्री मधील अनेक घाट वाटा. प्राचीन काळापासून महत्व लाभलेल्या या घाट वाटा घाटमाथ्याला कोकणाशी जोडत. Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘शिवनेत्र बहिर्जी’- स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्यावर आधारित कादंबरी

कोणत्याही लढाई मध्ये डावपेच हे फार महत्त्वाचे असतात. डावपेच योग्य असतील तर कमी सैन्य वापरूनही बलाढ्य शत्रूला धूळ चारता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध सैन्य मोहिमांमध्ये नेहमीच हे दाखवून दिले. पण हे डावपेच रचण्यासाठी चालून येणाऱ्या शत्रुची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक असते. यामुळेच शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मजबूत आणि कार्यक्षम असे गुप्तहेर खाते निर्माण केले Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

आदिपर्व – छत्रपती मालोजी राजांचा जीवनप्रवास

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामागे पराक्रमाचा फार मोठा वारसा त्यांना मिळाला होता. त्यांचे पिता शहाजी राजे आणि त्यांचे आजोबा मालोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाने आपला काळ गाजवला होता. याच मालोजी राजांचा जीवनप्रवास कादंबरीच्या रूपाने ‘आदिपर्व’ या पुस्तकात डॉ प्रमिला जरग यांनी शब्दबद्ध केला आहे.वेरूळच्या बाबाजी राजे भोसले यांचे थोरले पुत्र असलेले मालोजी Read more

मराठी पुस्तके

माओ-त्से-तुंग – चीनी साम्यवादी क्रांतीचे रोमहर्षक चित्र आणि चरित्र

१९९०-९१ मध्ये सोविएत रशिया कोसळल्यानंतर जगभरामध्ये साम्यवादाचा फोलपणा सर्वांच्या समोर आला. मूळात याची सुरुवात १९५६ मध्येच झाली होती ज्यावेळी सोविएत रशियाचा तत्कालीन अध्यक्ष निकिता कृश्चेवने साम्यवादी पक्षाच्या २०व्या अधिवेशनात स्टॅलिनच्या अमानुष कृत्यांचा पाढा जाहीरपणे वाचला. जवळपास तब्बल २५ वर्षे जागतिक साम्यवादी चळवळीचे नेतृत्व केलेल्या स्टॅलिनच्या विरोधातील कृश्चेवचे हे भाषण साम्यवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. सोविएत Read more

मराठी पुस्तके

अपोलो ११ – चंद्रावरील माणसाच्या यशस्वी स्वारीची रोमांचक कहाणी

‘The Egle has landed..’ (ईगल उतरले आहे) अपोलो ११ यानाने पृथ्वीवर पाठवलेला हा संदेश ऐकण्यासाठी समस्त मानवसमाज कित्येक वर्षे धडपडत होता, संघर्ष करत होता. काय होते अपोलो ११ मिशन? अपोलो ११ केवळ एक नाव नाही  अपोलो ११ म्हणजे माणसाच्या जिद्दीचे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक! अपोलो ११ म्हणजे असंख्य अपयशे येऊन सुद्धा खचून न जाता यशासाठी Read more

मराठी पुस्तके

छत्रपती शिवाजी महाराज – जगातले एक ग्रेट इंजीनियर

प्रस्तावना भारतीय राजकारणामध्ये सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग बर्‍याच वेळा केला जातो. काही नेत्यांना या प्रयोगाद्वारे अभूतपूर्व यश मिळाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. पण जवळपास ३९२ वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध क्षेत्रांमध्ये सोशल इंजिनीयरिंगचे यशस्वी प्रयोग केले होते आणि त्यातूनच पुढे सामान्य रयतेच्या सहभागाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. चुकीच्या रूढी-परंपरांना नष्ट करत विविध सण साजरे करणे, विविध Read more

मराठी पुस्तके

‘मोसाद’ – भल्याभल्यांनाही पुरून उरणारी मूठभर देशाची चिमूटभर गुप्तहेर संस्था

प्रस्तावना सप्टेंबर १९२९ मध्ये अरबांना आपल्या एकतेची ताकद दाखवून देण्यासाठी ज्यू लोक जेरुसलेम मधील प्राचीन हेरोदच्या दुसऱ्या देवळाच्या भिंतीपाशी जमा झाले. दुपारच्या वेळी त्यांनी त्यांची शेमा नावाची विशिष्ट प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. पण काही वेळातच त्यांच्यावर अरबांनी दगडे, फुटक्या बाटल्या आणि दगडे भरलेल्या डब्यांनी जोरदार हल्ला केला. या अनपेक्षित अशा हल्ल्यात कोणीही दगावले नसले तरी Read more