Latest Posts

अनुवादित

द कृष्णा की – भगवान कृष्णाच्या अमूल्य ठेव्याचे प्राचीन रहस्य

महाभारत खरोखर घडले होते का? की ते एक काल्पनिक महाकाव्य होते? श्री कृष्ण ही काल्पनिक व्यक्तिरेखा होती की प्रत्यक्षात त्याचे अस्तित्व होते? जर श्री कृष्ण प्रत्यक्षात होते तर त्याचे अस्तित्व पौराणिक होते की ऐतिहासिक? लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारा स्यमंतक मणी जादुई होता की त्या मागे काही वैज्ञानिक कारण होते? अण्वस्त्रांचा शोध प्रथम रॉबर्ट ओपेनहायमर ने Read more

स्पाय प्रिन्सेस - जॉर्ज क्रॉस विजेती भारताची महिला गुप्तहेर
अनुवादित

स्पाय प्रिन्सेस – जॉर्ज क्रॉस विजेती भारताची महिला गुप्तहेर

ती माताहारी सारखी फार मोठी गुप्तहेर नव्हती पण तीने दुसर्‍या महायुद्धात जे काही हेरगिरीचे कार्य पार पाडले तेसुद्धा उल्लेखनीय होते. तिच्या या कामगिरीने दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशांना जर्मनी विरूद्ध बहुमोल माहिती मिळत गेली. तिच्या या कामगिरीबद्दल तिला जॉर्ज क्रॉस हा ब्रिटिश सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देण्यात आला. गंमत म्हणजे तिचे वडील भारतीय होते आणि आई अमेरिकन Read more

मराठी पुस्तके

१९६२ची नामुष्की – एक न सांगण्याजोगी गोष्ट

१९६२ची नामुष्की – एक न सांगण्याजोगी गोष्ट! एखाद्या देशासाठी, समाजासाठी काही गोष्टी नामुष्कीजनक असतात. पण त्याच देशाच्या भावी पिढीच्या वाट्याला तशीच नामुष्की पुन्हा येऊ नये म्हणून या न सांगण्याजोग्या गोष्टी सुद्धा नाईलाजाने सांगाव्या लागतात. १९६२ मध्ये चीन विरुद्धच्या लढाईत भारताचा झालेला दारुण पराभव ही एक अशीच न सांगण्याजोगी गोष्ट! ही पराभवाची शोकांतिका पुन्हा आपल्या वाट्याला Read more

अनुवादित

१९४५ मध्ये नेमके काय झाले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रहस्य

१८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान मधील सायगाव येथे झालेल्या कथित विमान अपघातात झालेला नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू हे आजपर्यंतचे भारतातील कदाचित सर्वात मोठे रहस्य असावे. १९४५ मध्ये नेमके काय झाले? या रहस्याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत भारत सरकारने तीन वेगवेगळ्या समित्या स्थापूनही हे रहस्य अजूनही उलगडता आलेले नाही. नेताजींच्या या रहस्याबाबत सत्य शोधून काढण्याची Read more

अनुवादित

चरित्र विश्लेषण – गांधी VS जिन्ना – अंतिम भाग

गांधीजी आणि जिन्ना हे जवळपास ४० वर्षे भारतीय राजकारणात होते. या दरम्यान ते हजारो लोकांच्या संपर्कात आले. याच हजारो लोकांच्या साक्षी आणि आठवणींमधून प्रामुख्याने या दोघांचे जीवन चरित्र उलगडत जाते. गांधीजींचे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांशी चांगले संबंध असल्याने आज गांधीजींविषयी बरीच माहिती आणि लिखाण उपलब्ध आहे. जिन्ना मात्र थोडे आत्ममग्न स्वभावाचे असल्याने त्यांचे फारसे मित्र Read more

अनुवादित

कॅबिनेट मिशन, प्रत्यक्ष कृती दिन आणि भारताची फाळणी – गांधी VS जिन्ना – भाग ०६

दुसर्‍या महायुद्धामुळे भारतात ब्रिटिशांची दडपशाही वाढली. अन्नधान्याच्या किंमती अवास्तव वाढल्या आणि काही भागात तर दुष्काळ ही पडला. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध जिंकले. पण या विजयानंतर भारताच्या भवितव्याबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले. ब्रिटिश अजून किती काळ भारताला आपल्या ताब्यात ठेवतील आणि ब्रिटिश निघून गेल्यानंतर भारताचे भवितव्य कसे असेल हे स्पष्ट नव्हते. गांधी vs जिन्ना Read more

अनुवादित

दुसरे महायुद्ध, क्रिप्स मिशन – गांधी VS जिन्ना – भाग – ०५

१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटिश सरकारने हे युद्ध जिंकण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. ब्रिटिशांनी कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या त्यांच्या विरोधकांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. या युद्ध काळात सनदशीर मार्गाने स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे हे कॉंग्रेसला माहित होते. म्हणून कॉंग्रेस ने आक्रमक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला. त्यानूसार Read more

अनुवादित

गांधी VS जिन्ना – दांडी यात्रा, सविनय कायदेभंग, पाकिस्तानची संकल्पना- भाग-०४

नवीन दशकाला सुरुवात झाली त्यावेळी जिन्नांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले होते आणि राजकीय आयुष्यात ते एकटे होते. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी चालू असलेले त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरत होते. जिन्ना यांच्या तुलनेत पंजाब, बंगाल इत्यादी ठिकाणचे प्रांतिक मुस्लिम नेते प्रबळ होते आणि त्यांना एकूण मुस्लिम समाजाच्या हितापेक्षा आपल्या प्रांतातील आपला प्रभाव व सत्तेची चिंता जास्त होती. या Read more

अनुवादित

गांधी VS जिन्ना – भाग ०३ – असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ इत्यादी

गांधी VS जिन्ना याच्या आजच्या भाग ०३ मध्ये वाचा असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ इत्यादी अनेक घडामोडींमध्ये या दोघांच्या भूमिका. १९१९ मध्ये गांधी आणि जिन्ना यांच्यात कॉंग्रेसचे नेतृत्व आणि संघटनेचे स्वरूप या बाबींवर सुप्त संघर्ष सुरू झाला होता. त्याकाळी मुस्लिम लीग चे नेते प्रामुख्याने प्रादेशिक पातळीवरील राजकारणात उत्सुक होते. त्यामुळे कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर मुस्लिम लीग शिवाय Read more

अनुवादित

गांधी VS जिन्ना – भाग – ०२ – भारतीय राजकारणातील आगमन

१९००व्या शतकाच्या सुरूवातीला भारतातील ब्रिटिश सत्तेत व्हाईसरॉय हे सर्वोच्च होते. त्यांच्या हाताखाली विविध राज्य आणि स्थानिक पातळीवरील कायदेमंडळाद्वारे सत्ता राबवली जायची. केवळ स्थानिक पातळीवर होणार्‍या थोड्याफार निवडणुका वगळल्या तर या सर्व व्यवस्थेमध्ये उच्च पातळीवर लोकांचे प्रतिनिधित्व करणारे कोणीही नव्हते. ब्रिटिशांच्या या व्यवस्थेबाहेर असलेल्या भागांमध्ये संस्थानिक आणि राजे-महाराजांचे राज्य होते. हे राजे-महाराजे आपापल्या संस्थानाचे व्यवहार पाहण्यास Read more