Tag: america

पुस्तके - थोडक्यात परिचय

अमेरिका आणि सोविएत संघामधील अंतराळ स्पर्धा

ही कहाणी आहे दोन देशांमध्ये झालेल्या अंतराळ स्पर्धेची. सर्व प्रथम अंतराळात कोण आपले रॉकेट पाठवेल, कोण सर्वप्रथम अंतराळात माणूस पाठवेल इथून चालू असलेली ही स्पर्धा कोण सर्व प्रथम चंद्रावर माणूस उतरवेल इथपर्यंत येऊन पोचली. २० जुलै १९६९ रोजी अपोलो ११ मधून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरल्यावर ही स्पर्धा अमेरिकेने जिंकली असली तरी सोव्हिएत रशियानेही या स्पर्धेत Read more

अनुवादित

रॉबिन कूक यांची ‘क्युअर’ कादंबरी – एक वैद्यकीय थरारकथा

न्यूयॉर्क मधल्या सबवे ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर एका जपानी माणसाचा गुढ मृत्यू होतो. प्रथमदर्शनी तरी हा एक नैसर्गिक मृत्यूच वाटत असतो. किंबहुना त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वाटत राहणे हे काही लोकांच्या भल्याचे असते. पण न्यूयॉर्कच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर लॉरी मॉन्टेगोमरीला मात्र त्या जपानी माणसाच्या मृत्यूमध्ये काहीतरी काळेबोरे वाटत असते. पण तिला तसे सिद्ध करण्यापासून रोखण्यासाठी एक भयानक Read more

अनुवादित

द किल लिस्ट – अज्ञात दहशतवाद्याचा थरारक शोध

जगातील एका अज्ञात अशा ठिकाणाहून एक दहशतवादी इंटरनेट द्वारे अत्यंत जहरी प्रवचन देऊन तरुणांना दहशतवादी कृत्यासाठी चिथावत असतो. त्या व्यक्तीबद्दल अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांना काहीच माहिती नसते. त्याचे नाव, गाव, चेहरा अगदी काहीच नाही. प्रवचने देत असल्याने त्याला अमेरिकेने ‘द प्रीचर’ हे सांकेतिक नाव ठेवलेले असते आणि हे नाव अमेरिकेच्या ‘द किल लिस्ट’ मध्ये Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

संकट आयसिसचे – अल कायदा पेक्षा ही मोठे संकट

‘हे म्हणजे जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने मेक्सिको मध्ये घुसखोरी केल्यासारखे आहे’. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००३ मध्ये इराक वर हल्ल्याचा निर्णय घेतला तेव्हा एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने वरील शब्दात याला विरोध केला होता. खरेच बोलला तो. अमेरिकेने इराक वर हल्ला करून सद्दाम हुसेनची सत्ता उलथून टाकली. कालांतराने सद्दामला पकडून Read more

मराठी पुस्तके

मोसाद चे ‘ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स’- इजिप्तचा शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्प बंद पाडण्याची कहाणी

दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने अग्निबाण निर्मितीच्या क्षेत्रात चांगली प्रगती केली होती. या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला असला तरी जर्मनीच्या v-२ अग्निबाणांनी तर एक वेळ मित्र राष्ट्रांच्या तोंडचे पाणी  पळवले होते. महायुद्धानंतर या कुशल जर्मन शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांना अमेरिका आणि सोविएत रशियाने आपापल्या देशात नेले आणि त्यांच्या मदतीने अग्निबाण व क्षेपणास्त्र बनवायला सुरुवात केली. इस्रायलचा कट्टर शत्रू Read more

मराठी पुस्तके

अपोलो ११ – चंद्रावरील माणसाच्या यशस्वी स्वारीची रोमांचक कहाणी

‘The Egle has landed..’ (ईगल उतरले आहे) अपोलो ११ यानाने पृथ्वीवर पाठवलेला हा संदेश ऐकण्यासाठी समस्त मानवसमाज कित्येक वर्षे धडपडत होता, संघर्ष करत होता. काय होते अपोलो ११ मिशन? अपोलो ११ केवळ एक नाव नाही  अपोलो ११ म्हणजे माणसाच्या जिद्दीचे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक! अपोलो ११ म्हणजे असंख्य अपयशे येऊन सुद्धा खचून न जाता यशासाठी Read more

मराठी पुस्तके

साम्यवादाचा फोलपणा दाखवणारे कृश्चेवचे भाषण मोसादला कसे मिळाले?

दुसरे महायुध्द संपले आणि अमेरिका व सोव्हिएत युनियन मध्ये शीत युद्धाला सुरुवात झाली. भिन्न विचारसरणी असलेल्या या दोन्ही महासत्तांमध्ये जग विभागले गेले. अमेरिका अनुसरीत असलेल्या भांडवलशाहीमध्ये कामकरी आणि कष्टकऱ्यांचे शोषण होत असल्याच्या भावनेने सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचारसरणीने अनेकांना वेड लावले होते. जगभरातील या साम्यवादी चळवळीचे नेतृत्व जवळपास तब्बल २५ वर्षे सोव्हिएत युनियनचा अध्यक्ष जोसेफ स्टॅलिनने Read more