Tag: history

पुस्तके - थोडक्यात परिचय

सियालकोट गाथा – लहानपणी ताटातूट झालेल्या दोन भावांची कहाणी

सियालकोट गाथा आहे अरविंद आणि अरबाज या दोन व्यक्तींची ! कलकत्त्यात एका मारवाडी व्यापारी सुखवस्तू कुटुंबातील अरविंद आणि मुंबई मधील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील अरबाज तसे एकमेकांपासून जवळपास २००० किमी अंतरावर आपले जीवन व्यतीत करत होते. पण नियतीने त्यांना वारंवार एकमेकांसमोर उभे केले. इतिहासातील अनेक मुख्य घटनांशी बेमालूमपणे आपले हे कथानक जोडून आश्विन सांघी यांनी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

पेशवाई – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याला आणखी बळकटी आणली. पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर आणि मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे यांची सुटका केल्यानंतर स्वराज्याचा खरा वारसदार कोण यासाठी महाराणी ताराबाई आणि शाहू राजे यांच्यात संघर्ष सुरू झाला. याचीच परिणती अखेर Read more

अनुवादित

द रोझाबल लाईन – एक रहस्यमय धार्मिक कादंबरी

द रोझाबल लाईन हे एक धार्मिक रहस्य लपवून ठेवलेलं ठिकाण. काय होते हे रहस्य? रोमन कॅथलिक चर्च जगभरातील ख्रिश्चन नंबर धर्माचा गाढा प्रभाव कायम राहावा यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी काहीही (अगदी काहीही) करायची त्यांची तयारी असते. तर दुसरीकडे असतात इल्युमिनाटी. मे १७७६ मध्ये जर्मनीतील बव्हेरियात सर्वप्रथम स्थापन झालेला हा गुप्त गट लोकांवरील चर्चचा प्रभाव Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

हेरगिरीचे विश्व हे जितके रोमांचक तितकेच धोकादायक! आपल्या देशासाठी परकीय मुलुखात हेरगिरी करताना जर पकडले गेले तर कोणतीही मदत न मिळता थेट मृत्यू. हे माहित असूनही हजारो गुप्तहेर आपले जीव धोक्यात घालून देशासाठी काम करत असतात. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा एक अशाच प्रकारचे गुप्तहेर. शत्रू प्रदेशात ओळख लपवून राहत माहिती Read more

मराठी पुस्तके

छत्रपती शिवाजी महाराज – व्यवस्थापन गुरु आणि व्यूहरचनाकार

प्रोजेक्ट अफजलखान – १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेला अफजलखानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यूहरचनात्मक प्रगल्भता आणि उत्तम व्यवस्थापकीय कौशल्याचा नमुना होता.  आग्र्याहून सुटका – छ. शिवाजी महाराजांचे आग्र्याला जाणे, औरंगजेबाच्या कैदेत राहणे आणि तिथून निसटून पुन्हा सुखरूप स्वराज्यात येणे यामध्ये जवळपास आठ महिन्यांचा कालावधी गेला. या काळात शिवराय कोठे आहेत हे कोणालाच माहित Read more

मराठी पुस्तके

पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान

पुतिन…. चांगला राजकारणी संधीची वाट पाहत नाही……ती स्वत: तयार करतो. ३१ ऑगस्ट १९९९ रोजी मॉस्को मधील एक मॉल मध्ये हादरवून टाकणार एक स्फोट झाला.. (एकाचा मृत्यू) याच्या काही दिवसांनंतर चेचन्या पासून जवळ असलेल्या बुयांस्क गावात लष्कराचे वरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या इमारतीत बॉम्बस्फोट झाला..(६४ जणांचा मृत्यू) यानंतर चार दिवसांनी (८सप्टेंबर १९९९) मॉस्कोच्या मध्यवर्ती भागातील निवासी संकुलात Read more

अनुवादित

महाभारत युद्ध आणि त्यामधील गूढ शस्त्र

ही कहाणी आहे महाभारतातील एका रहस्यमय अशा शस्त्राची ज्याला कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या मगधाच्या राजाने पांडवांविरुद्ध वापरण्यासाठी बनवले होते. पण हे शस्त्र वापरण्याची वेळच आली नाही. हे रहस्य इतके स्फोटक होते की सम्राट अशोकानेही हे रहस्यमय शस्त्र कधीच जगासमोर येऊ नये याचा काटेकोर बंदोबस्त केला. पण आता वर्तमानकाळात एक पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबा Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

भगतसिंगचा खटला – न्यायाच्या हत्येचे कारस्थान

“जर जर्मनीने अथवा रशियाने इंग्लंडवर आक्रमण केले, तर त्या आक्रमकांना हिंसक प्रतिकार करू नका,’ असा उपदेश लॉर्ड आयर्विन (इंग्लंडच्या) जनतेला करणार आहेत का? जर तसे ते करणार नसतील, तर या खटल्याबद्दलही त्यांनी काही उठाठेव करू नये. पण एक गोष्ट मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो – भगतसिंगची विचारसरणी मला पटो वा न पटो, त्याच्यासारख्या माणसाचे अविचल धैर्य Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

सोविएत रशियाची KGB

प्राचीन काळातील साम्राज्ये आणि आजच्या काळातील विविध देशांपुढे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते ते म्हणजे आपले अस्तित्व टिकवून प्रगती करत राहणे. आता अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इतर राज्ये आणि देशांसोबत संघर्ष करणे हे ओघाने आलेच. प्रत्येक देश अशा प्रकारच्या संघर्षात वरचढ राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. पण यासाठी गरज असते शत्रूला पूर्णपणे जाणण्याची. Sun Tzu ने सुद्धा म्हटले Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

डोमेल ते कारगिल – काश्मीरच्या परिस्थितीचे सखोल विश्लेषण

२२ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानने डोमेल या भारतीय चौकीवर दगाफटका आणि फंद फितुरीने कब्जा केला. स्वातंत्र्यानंतर ‘ऑपरेशन गुलमर्ग’ या काश्मीर वर कब्जा मिळवण्याच्या आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानने डोमेल पासून केली. आपले राज्य गमावण्याच्या भीतीने महाराजा हरिसिंग ने जम्मू काश्मीर राज्य भारतात विलिनीकरण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आणि जम्मू काश्मीर भारताचा कायदेशीर आणि अविभाज्य भाग बनला. Read more