Tag: India

पुस्तके - थोडक्यात परिचय

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ‘माझी आत्मकथा’

‘घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक Read more

अनुवादित

‘ऑपरेशन कोह पैमा’ – पाकिस्तानची फसलेली कारगिल मोहिम

ऑपरेशन कोह पैमा “पहिल्या टप्प्यात आपण मुजाहिद्दीन आणि सैन्याला काश्मीरमधील कारगिल येथे घुसवून महत्त्वाच्या शिखरांच्या वर कब्जा करू. हा टप्पा आपण याआधीच पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्यात आपण मुजाहिदीनना (पाक सैन्याला) जम्मू आणि लडाख मध्ये घुसवून तेथे बंडखोरी घडवून आणू. तिसरा टप्पा त्यावेळी चालू होईल ज्यावेळी जम्मू व लडाख मधील बंडखोरीमुळे दबावात येऊन भारत सरकार Read more

अनुवादित

अश्विन सांघी यांनी लिहिलेले ‘चाणक्याचा मंत्र’

ग्रीसचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघालेला असतो आणि आता भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. अशावेळी त्याचा एकजुटीने मुकाबला करायचा सोडून भारतातील गांधार, मगध, कैकेय इत्यादी मोठी राज्ये आपापसात लढण्यात गुंग होती. परकीय शत्रू सीमेवर येऊन ठेपलाय याचे काहीही गांभीर्य त्यांना नव्हते. अशा वेळी त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न चाणक्य करतो. मगध सारख्या बलाढ्य साम्राज्याचा राजा धनानंदला Read more

अनुवादित

कालचक्राचे रक्षक – श्वास रोखून ठेवायला लावणारी कादंबरी

जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांच्या अचानकपणे हत्या होत असतात. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरू अत्यंत सराईतपणे कोणताही मागमूस न ठेवता या नेत्यांच्या हत्या करत असतो. मुळात एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरी त्या नेत्यांपर्यंत पोहोचतोच कसा? हेच जगभरातल्या तपास संस्थांना समजत नसते. या सर्व हत्यांचा थेट संबंध भारतातील उत्तराखंड राज्यातल्या एक मिलेशियन लॅब नावाच्या एका Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

Eagles over Bangladesh – भारतीय हवाई दलाचा १९७१ च्या युद्धातील पराक्रम

१६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका मध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख एअर मार्शल एच सी दिवाण यांनी पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए ए के नियाजी (ज्यांनी पाकिस्तान तर्फे आत्मसमर्पणाच्या कागद पत्रावर स्वाक्षरी केली होती) यांना विचारले की तुमच्याकडे अजून काही काळ युद्ध करता येईल इतके सैन्य असताना तुम्ही आत्मसमर्पण Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

सियालकोट गाथा – लहानपणी ताटातूट झालेल्या दोन भावांची कहाणी

सियालकोट गाथा आहे अरविंद आणि अरबाज या दोन व्यक्तींची ! कलकत्त्यात एका मारवाडी व्यापारी सुखवस्तू कुटुंबातील अरविंद आणि मुंबई मधील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील अरबाज तसे एकमेकांपासून जवळपास २००० किमी अंतरावर आपले जीवन व्यतीत करत होते. पण नियतीने त्यांना वारंवार एकमेकांसमोर उभे केले. इतिहासातील अनेक मुख्य घटनांशी बेमालूमपणे आपले हे कथानक जोडून आश्विन सांघी यांनी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

पेशवाई – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याला आणखी बळकटी आणली. पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर आणि मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे यांची सुटका केल्यानंतर स्वराज्याचा खरा वारसदार कोण यासाठी महाराणी ताराबाई आणि शाहू राजे यांच्यात संघर्ष सुरू झाला. याचीच परिणती अखेर Read more

अनुवादित

द रोझाबल लाईन – एक रहस्यमय धार्मिक कादंबरी

द रोझाबल लाईन हे एक धार्मिक रहस्य लपवून ठेवलेलं ठिकाण. काय होते हे रहस्य? रोमन कॅथलिक चर्च जगभरातील ख्रिश्चन नंबर धर्माचा गाढा प्रभाव कायम राहावा यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी काहीही (अगदी काहीही) करायची त्यांची तयारी असते. तर दुसरीकडे असतात इल्युमिनाटी. मे १७७६ मध्ये जर्मनीतील बव्हेरियात सर्वप्रथम स्थापन झालेला हा गुप्त गट लोकांवरील चर्चचा प्रभाव Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

हेरगिरीचे विश्व हे जितके रोमांचक तितकेच धोकादायक! आपल्या देशासाठी परकीय मुलुखात हेरगिरी करताना जर पकडले गेले तर कोणतीही मदत न मिळता थेट मृत्यू. हे माहित असूनही हजारो गुप्तहेर आपले जीव धोक्यात घालून देशासाठी काम करत असतात. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा एक अशाच प्रकारचे गुप्तहेर. शत्रू प्रदेशात ओळख लपवून राहत माहिती Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

डॉ मनमोहन सिंग – द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर

“मला जो धोका पत्करावा लागणार आहे, याची मला जाणीव आहे. टी टी कृष्णम्माचारी हे एकदा मला म्हणाले होते की ‘दिल्लीच्या रस्त्यांवर वाघ दबा धरुन बसलेले असतात’. मला संभाव्य धोक्याची कल्पना आहे, पण भारताच्या कल्याणासाठी मी तो धोका पत्करण्यास तयार आहे.” स्वतःला अपघाताने झालेला पंतप्रधान मानणाऱ्या डॉ मनमोहन सिंग यांचे हे आत्मविश्वासाने भरलेले उद्गार २००६ मधील Read more