प्रवास करायला जवळपास सर्वांनाच आवडते तसेच प्रवास वर्णन पर पुस्तके वाचायला सुद्धा. मराठीमध्ये सुद्धा अनेक लेखकांनी आपल्या प्रवास वर्णनाची पुस्तके लिहून ठेवलेली आहेत. पण या सर्वांपेक्षा हटके आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्री चंद्रशेखर टिळक यांनी त्यांनी केलेल्या विविध ठिकाणच्या प्रवासांचे वर्णन आपल्या ‘केल्याने देशाटन’ या पुस्तकात केले आहे.
आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने श्री चंद्रशेखर टिळक हे महिन्यातील पंधरा ते वीस दिवस भारताच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. या प्रत्येक ठिकाणी त्यांना आलेले विविध अनुभव, तिथले खानपान, संस्कृती, हवामान, निसर्ग इत्यादी अनेक बाबी त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. हे प्रवास वर्णन इतके हलकेफुलके आणि आटोपशीर आहे की काही ठिकाणी तर ते अर्ध्या पानातच संपते.
अत्यंत थोडक्यात, खुमासदार पद्धतीने लिहिलेले पण तरीही वाचताना मनाला आनंद देणारे हे हे आगळेवेगळे प्रवासवर्णन आवर्जून वाचावे असे.