मुझे जंग-ए-आजादी का मजा मालूम है
बलुचिस्तान पर जुल्म की इंतेहा मालूम है,
मुझे जिंदगी भर पाकिस्तान मे जीने की
दुआ ना दो, मुझे पाकिस्तान में
इन साठ साल जीने की सजा मालूम है
पाकिस्तानात जबरदस्तीने सामील झालेल्या बलुचिस्तान मधील प्रत्येक नागरिकाची ही व्यथा आहे. पाकिस्तानी सरकारचा दुजाभाव आणि पाकिस्तानी लष्कर करत असलेला अनन्वित अत्याचार यामुळे बलुचिस्तान मधल्या नागरिकांनी सुद्धा आपल्या स्वातंत्र्यासाठी शस्त्र हाती घेतले आणि मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते आपला स्वातंत्र्यलढा नेटाने पुढे नेत आहेत. मूळच्या बलुच लोकांना यामध्ये मूळ मराठा असलेले बुगती मराठा समाजाचे सुद्धा सहाय्य मिळते. अभिषेक कुंभार यांची ‘कोहजाद’ ही कादंबरी याच कथानकावर फुलत जाते. या पुस्तकातून कोहजाद हा असाच एक बुगती मराठा आपल्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी पाकिस्तान विरूद्ध उभा ठाकलेला तुम्हाला दिसून येतो.
एकेकाळी कट्टर पाकिस्तान प्रेमी असलेला आणि त्यासाठी आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात गेलेला कोहजाद वास्तव परिस्थितीची जाणीव होताच त्वेषाने पाकिस्तान विरुद्ध शस्त्र घेऊन उभा राहतो आणि मग सुरू होते एका रोमहर्षक लढ्याची कहाणी. मातृभूमी वरचे प्रेम, सरकारी अत्याचार, आपल्या मराठा इतिहासाचा प्रचंड अभिमान, आंतरराष्ट्रीय राजकारण इत्यादी विविध पैलूंनी भरलेली ही कादंबरी तुम्हाला एक चांगले साहित्य वाचल्याचा आनंद देईल हे नक्की.
एक आवर्जून वाचावे असे पुस्तक.
पुस्तकाचे नाव – कोहजाद
लेखक – अभिषेक कुंभार
पब्लिकेशन्स – New Era Publishing House.