छत्रपती शिवाजी महाराज – रायरी – गोष्ट शिवभक्तांची

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलतानी अत्याचाराने पिचलेल्या रयतेमध्ये चेतना निर्माण करत रयतेचे स्वराज्य स्थापन केले. पूर्ण भारतात मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला. त्यांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवले, स्वाभिमानाने जगायला शिकवले. त्यांची कृती, त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज आजच्या पिढीला पूर्णपणे समजले आहेत का? शिवजयंतीला धांगडधिंगा करत नाचत मिरवणुका काढणे यातच आजची तरुण पिढी समाधान मनात आहे का? केवळ राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर करणारे राजकीय पक्ष यासाठी जबाबदार आहेत का? समाजात अनेक स्तरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात या तरुणांची काय भूमिका आहे?

शिवचरित्रातील अनेक विचारांच्या आधारे समाजाला बदलण्याचे सामर्थ्य आजच्या तरुण पिढी मध्ये आहे. पण हे करण्यासाठी त्यांना प्रेरित कोण करणार? विशाल गरड यांनी लिहिलेले ‘रायरी – गोष्ट शिवभक्तांची’ हे पुस्तक आजच्या पिढीमध्ये शिवचरित्र खऱ्या अर्थाने रुजवण्याचे काम प्रभावीपणे करू शकते. डुगारवाडी नावाच्या छोट्या खेड्यातील सरपंचाचे स्वार्थी राजकारण आणि त्याचे बेरोजगार कार्यकर्ते यांच्या अवतीभोवती या पुस्तकाची कथा फिरत राहते. सरपंचाच्या अनेक बेकायदेशीर गोष्टींमध्ये त्यांना साथ देणारे हे कार्यकर्ते नंतर शिवचरित्राच्या आधारे डावपेच रचून सरपंचालाच कसे नामोहरम करतात आणि एक चांगल्या राजकारणाची पायाभरणी करतात हे वाचणे खरेच स्फूर्तिदायी आहे.

प्रत्येक व्यक्तीने आवर्जून वाचावे असे पुस्तक.

पुस्तकाचे नाव – रायरी – गोष्ट शिवभक्तांची

लेखक – विशाल गरड

पब्लिकेशन्स – NEW ERA Publishing House.

छत्रपती शिवाजी महाराज
रायरी – गोष्ट शिवभक्तांची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *