मेक्सिको मधील माया लोकांच्या पिरॅमिड मध्ये शिलाखंडावर अग्निबाणातील अंतराळवीर कोरलेला आहे.
पेरू देशातील अतिप्राचीन दगडांवर हृदय बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा एक टप्पा दाखवण्यात आला आहे.
सुमेरियन लोकांनी अशी एक पंधरा आकडी संख्या लिहून ठेवली आहे जी आजच्या कॉम्प्युटर मध्ये सुद्धा येत नाही.
चीन मध्ये भूकंपात सरोवरातून वर आलेल्या पिरॅमिड वर अग्नीबाणांची चित्रे आहेत.
इस्टर आयलंड वरील ३३ ते ६६ फूट उंच असे शेकडो पुतळे मूळात या बेटावर आलेच कसे?
नाझकाच्या पठारावरील मैल न मैल सरळ जाणाऱ्या रेषा प्राचीन काळातील विमानतळ तर नव्हते?
बगदाद मध्ये सापडलेल्या प्राचीन ड्राय बॅटरीज मधून आजही १ volts चा विद्युतप्रवाह निर्माण करता येतो.
अशी असंख्य उदाहरणे आज जगभरात आढळतात. यांची पूर्णपणे समाधानकारक उकल झालेली नाही. पण आपल्या पूर्वजांकडे असलेले हे तंत्रज्ञान पाहून स्तिमित व्हायला होते. त्यांच्याकडे हे तंत्रज्ञान आले कुठून? कोणी त्यांना शिकवले? विविध प्राचीन संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेले देवांचे वर्णन हे आजच्या अंतराळवीरांसारखे वाटते? मग देव म्हणजे प्राचीन काळी दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीला भेट दिलेले अंतराळवीर होते का?
प्राचीन काळी आपले पूर्वज अत्यंत मागासलेले होते. अशावेळी अंतराळातून येणारे लोक त्यांना देव वाटल्यास नवल नाही. तो वापरात असलेल्या वस्तूंची यशाशक्ती चित्रे त्याने ठिकठिकाणी काढली. तीच आज आपल्याला विविध ठिकाणी दिसतात. विविध प्राचीन धर्मग्रंथ वाचले तर त्यामध्ये काही ठिकाणी आश्चर्यकारक समानता आढळते. जगाच्या विविध टोकावर असलेल्या पुराण गोष्टींमधील साम्य थक्क करते.
आपल्या अंतराळात लाखो ग्रह आहेत. अशावेळी पृथ्वीवरील संस्कृतीपेक्षा प्रगत अशी संस्कृती दुसऱ्या ग्रहावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावरच बाळ भागवत यांनी लिहिलेले ‘देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर!‘ हे अत्यंत चित्तवेधक असे पुस्तक आवर्जून वाचावे असे.
पुस्तकाचे नाव – देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर!
लेखक – बाळ भागवत
पब्लिकेशन्स – मेहता पब्लिशिंग हाऊस.
पुस्तक येथून खरेदी करा