फ्लाईट लीडर (लेफ्टनंट चार्ल्स टेलर) : Calling Tower, this is an emergency. आम्ही बहुधा मार्ग चुकलोय. आम्हाला जमीन दिसत नाही……पुन्हा सांगतो….आम्हाला जमीन दिसत नाही.
Tower : तुमच नेमक स्थान काय आहे?
फ्लाईट लीडर : आमच्या नेमक्या स्थानाबद्दल आम्हाला काही खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आम्ही कुठे आहोत हेच आम्हाला कळत नाही…..बहुधा आम्ही वाट चुकलोय.
Tower : तुम्ही पश्चिमेकडे जात आहात असे गृहीत धरा.
फ्लाईट लीडर – पश्चिम दिशा कोणत्या बाजूला आहे हेच आम्हाला कळत नाही….सर्वच गोष्टी चुकल्यागत वाटतायत….विचित्रच प्रकार…आम्हाला कोणत्याच दिशेचा अंदाज येत नाही आहे….समुद्रसुद्धा जसा दिसायला हवा तसा दिसत नाही आहे..
हे संभाषण आहे ५ डिसेंबर १९४५ रोजी उड्डाण केलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या ट्रेनिंग फ्लाईट नंबर १९ चा लीडर लेफ्टनंट चार्ल्स टेलर आणि Air Traffic Control टॉवर यांच्यामधील. अमेरिकेच्या फोर्ट लॉडरडेल मधून उड्डाण केलेली पाच विमाने अमेरिकेच्या आग्नेय किनार पट्टीपासून काही अंतरावर, अटलांटिक समुद्रात रहस्यमयरित्या गायब झाली. आश्चर्य म्हणजे त्यांना शोधण्यासाठी गेलेले विमानही त्याच प्रदेशात गायब झाले. आजपर्यंत या विमानांचा काहीच पत्ता लागलेला नाही. हा रहस्यमय सागरी प्रदेश आहे ‘बर्म्युडा ट्रँगल’. उत्तरेकडे बर्म्युडा पासून निघून ते दक्षिणेला फ्लोरिडापर्यंत जाणाऱ्या, तिथून पूर्वेकडे बहामा बेटांमधून जात ४० अंश पश्चिम रेखांकावरून प्युर्टोरीको मागे टाकून पुन्हा बर्म्युडाकडे येणाऱ्या काल्पनिक रेषांपासून हा त्रिकोणाकार भाग तयार झाला आहे.
विमाने आणि जहाजे रहस्यमयरित्या गायब होत असल्याने या प्रदेशाला नेहमीच ‘हरवणाऱ्या जहाजांचा समुद्र’, हरवलेल्या जहाजांची दफनभूमी’, ‘भीतीचा समुद्र’ अशी विविध विशेषणे प्राप्त झाली आहेत. आजपर्यंत या प्रदेशात शंभराहून अधिक विमाने नि बोटी नाहीशा झाल्या, एक हजाराहून अधिक माणसे गूढपणे बेपत्ता झाली. अत्यंत विस्तृत शोध मोहिमा राबवूनही काही फायदा झाला नाही.
गायब होण्याबद्दल आजपर्यंत वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत. अगदी परग्रहावरील लोक, अथांग समुद्रगर्भातील आपल्याला अज्ञात अशी एखादी संस्कृती यांच्यावरही संशय घेतला गेला. पण आजही याचे नेमके कारण शोधता आलेले नाही.
अर्थात बर्म्युडा ट्रँगल मधून निसटून सुखरूप आलेले लोकही आहेत. त्यांचा अनुभव वाचला कि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
आजही न उलगडलेले रहस्य असलेल्या बर्म्युडा ट्रँगल विषयी विजय देवधर यांनी लिहिलेले ‘बर्म्युडा ट्रँगल’ हे अत्यंत उत्कंठावर्धक पुस्तक आवर्जून वाचावे असे.
(स्वानुभवाने आणि खात्रीने सांगतो पुस्तक एकदा वाचायला सुरू केले की संपवल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही)
पुस्तकाचे नाव – बर्म्युडा ट्रँगल
लेखक – विजय देवधर
पब्लिकेशन्स – श्रीराम बुक एजन्सी.
पुस्तक amazon वरून विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा – https://amzn.to/3enN1YY