‘मॅन हंट’ – बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा

११ सप्टेंबर २००१ – सकाळची वेळ – कंदाहार (अफगाणिस्तान) 👇👇

‘आज बातम्या पाहणं खूप महत्त्वाचं आहे’ असे ओसामा बिन लादेन आपल्या अंगरक्षकाला म्हणाला.

२९ एप्रिल २०११ – सकाळची वेळ – व्हाइट हाऊस, अमेरिका 👇👇

मी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि तो ‘होय’ असा आहे”. ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी ‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’ ला ओबामा यांनी संमती दिली.

०२ मे २०११ – मध्यरात्र – अबोटाबाद (पाकिस्तान) 👇👇

अबोटाबाद येथील एका गढीवजा घरातील बिन लादेन आणि त्याचे कुटुंबीय एका मोठ्या आवाजाने जागे झाले. लादेनने आपल्या मुलीला खाली जाऊन झोपायला सांगितले आणि आपल्या पत्नीला सांगितले, ‘दिवा लाऊ नको’. बिन लादेनच्या तोंडचे हे अखेरचे शब्द ठरणार होते.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर अत्यंत भयानक असा दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेने दहा वर्षांनी २ मे २०११ रोजी पाकिस्तान मधील अबोटाबाद येथे ठार मारले. अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान दिमतीला असूनही लादेन तब्बल दहा वर्षे अमेरिकेला गुंगारा देण्यात यशस्वी ठरला. पण अमेरिकेनेही हार न मानता लादेनची शोधमोहीम चालूच ठेवली आणि अखेर अल कायदाच्या प्रमुखाला गाठलेच. अमेरिकेने लादेनला कसे शोधले हे वाचणे अतिशय रोमांचक आहे. बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा पीटर बर्गन यांनी ‘मॅन हंट’ या आपल्या पुस्तकात दिली आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री रवी आमले यांनी केला आहे.

आवर्जून वाचावे असे पुस्तक.

पुस्तकाचे नाव – मॅन हंट

लेखक – पीटर बर्गन

अनुवाद – रवी आमले

पब्लिकेशन्स – डायमंड पब्लिकेशन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *