‘विश्वात आपण एकटेच आहोत काय?

युरोपात दुसऱ्या महायुद्धाची रणधुमाळी चालू असतानाच अमेरिकेतील लॉस ॲलमोस येथील अण्वस्त्र संशोधन केंद्रामध्ये काम करणाऱ्या अनेक नामवंत शास्त्रज्ञांच्या मध्ये अनेकदा गप्पागोष्टी घडत असत. अशाच एका गप्पाष्टकात परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा विषय निघाला. तेव्हा, ‘ते कुठे आहेत?’ असा एक मार्मिक प्रश्न एन्रिको फर्मी या विख्यात शास्त्रज्ञाने उपस्थित केला. मुळात परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचे अस्तित्व संशयास्पद आहे असेच फर्मी यांना आपल्या प्रश्नाद्वारे सुचवायचे होते.

त्याच दिवशी त्या गप्पाष्टक मंडळीत लिओ स्तिलार्ड हा हंगेरीत जन्माला आलेला शास्त्रज्ञ सुद्धा उपस्थित होता. फर्मीच्या प्रश्नावर तो झटकन उद्गारला, “ते आपल्यातच आहेत, पण आता ते स्वतःला हंगेरियन म्हणवून घेतात.” त्याकाळी हंगेरियन लोक हे मंगळावरून आले आहेत असा एक सिद्धांत प्रचलित होता. लिओ स्तिलार्डच्या विधानामागे ही पार्श्वभूमी होती.

पण फर्मी यांनी विचारलेला प्रश्न आजही विचारला जातो. ते कुठे आहेत? ते कोण आहेत? विश्वात आपण एकटेच आहोत का? परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी गेली कित्येक दशके पृथ्वीवरील मानव प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. पण हे होणे बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. अनंत अशा अवकाशात जीवसृष्टीच्या उत्क्रांतीसाठी कशा प्रकारचा ग्रह असावा? तो त्याच्या ताऱ्यापासून किती अंतरावर असावा? त्या ताऱ्याचे त्याच्या आकाशगंगेत स्थान नेमके कुठे असावे? पिरॅमिड, नाझका रेषा, इस्टर आयलंड वरील पुतळे, कथित उडत्या तबकड्या इत्यादी परग्रहावरील कोण्या प्रगत संस्कृतीकडे इशारा करतात का जी प्राचीन काळी पृथ्वीवर आली होती?

‘विश्वात आपण एकटेच आहोत काय?

तुम्हालाही ‘विश्वात आपण एकटेच आहोत का?’ हा प्रश्न पडला आहे का?

मग मोहन आपटे यांनी लिहिलेले ‘विश्वात आपण एकटेच आहोत काय?’ हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.

पुस्तकाचे नाव – ‘विश्वात आपण एकटेच आहोत काय?

लेखक – मोहन आपटे

पब्लिकेशन्स – राजहंस प्रकाशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *