Author: gajananharalikar

मराठी पुस्तके

साम्यवादाचा फोलपणा दाखवणारे कृश्चेवचे भाषण मोसादला कसे मिळाले?

दुसरे महायुध्द संपले आणि अमेरिका व सोव्हिएत युनियन मध्ये शीत युद्धाला सुरुवात झाली. भिन्न विचारसरणी असलेल्या या दोन्ही महासत्तांमध्ये जग विभागले गेले. अमेरिका अनुसरीत असलेल्या भांडवलशाहीमध्ये कामकरी आणि कष्टकऱ्यांचे शोषण होत असल्याच्या भावनेने सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचारसरणीने अनेकांना वेड लावले होते. जगभरातील या साम्यवादी चळवळीचे नेतृत्व जवळपास तब्बल २५ वर्षे सोव्हिएत युनियनचा अध्यक्ष जोसेफ स्टॅलिनने Read more

मराठी पुस्तके

‘ऑपरेशन थीफ’- मोसादने उधळला सिरियाचा शस्त्रसज्ज होण्याचा डाव

२९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाइनची फाळणी करून इस्रायलच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. अजून अधिकृतरित्या इस्रायलची स्थापना झालेली नसली तरी पॅलेस्टाइनच्या फाळणीमुळे अरब राष्ट्रे संतापली होती. आज ना उद्या इस्रायलची स्थापना झाल्यास शेजारची सर्व अरब राष्ट्रे मिळून इस्रायलवर हल्ला करणार याबद्दल ज्यू नेत्यांच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. त्याकाळी पॅलेस्टाईन मध्ये राहत असलेल्या Read more

मराठी पुस्तके

बोर्डरूम – औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या प्रेरणादायी आणि सुरस कहाण्या

१८९५ साली किंग जिलेटला एकदा दाढी करताना खूप त्रास झाला, तेव्हा त्याच्या डोक्यात दाढीचे ब्लेड्स बनवण्याची कल्पना आली आणि जिलेटचे साम्राज्य उभे राहिले.  डॉ जॉन केलॉग यांच्या निसर्गोपचार केंद्रात एके दिवशी धान्य कुटून केलेल्या लगद्याचा ट्रे रात्रभर तसाच राहिल्याने सकाळी वाळून गेला आणि त्यातूनच कॉर्नफ्लेक्सचा जन्म झाला.  १८८६ मध्ये जॉन पेबरटन या फार्मासिस्टने कोकेन, वाइन, Read more

अनुवादित

‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ चे गूढ – दहशतवाद्यांनी भारताविरोधात रचलेला एक भयानक कट

नवी दिल्ली जवळील नोएडा मधील निर्मनुष्य अशा गोल्फ रोड वर CISF च्या Addl Inspector General (AIG) च्या गाडीचा एका ट्रक सोबत अपघात होतो. हा अपघात नसून घातपात आहे याची जाणीव झालेल्या AIG नी आपल्या त्या रक्तबंबाळ अवस्थेतच आपल्या पत्नीला फोन लावला. त्यांनी पत्नीला सांगितले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ‘ट्यूपॅक II’ ला प्रारंभ केलाय आणि ही गोष्ट Read more

मराठी पुस्तके

बाजिंद – युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी

दुर्गदुर्गेश्वर रायगड शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू. मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक. याच गडाच्या टकमक टोकावरून अनेक शत्रूंचा आणि गद्दारांचा कडेलोट केला जायचा. टकमक टोक हे नाव ऐकताच गुन्हेगारांची पाचावर धारण बसायची. टकमक टोकाची दहशतच तशी होती. स्वराज्याच्या शत्रूंना जरब बसवणार्‍या या टकमक टोकामुळे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडी या गावासाठी मात्र एक संकट निर्माण केले होते. त्यासाठी Read more

मराठी पुस्तके

गोल्डा मायर – आयुष्यभर इस्राएलच्या कल्याणासाठी झटणारे एक अशांत वादळ

६ ऑक्टोबर १९७३ रोजी इजिप्तच्या नेतृत्वाखाली अरब राष्ट्रांनी इस्राएलवर हल्ला केला. ‘योम किप्पुर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात पहिले दोन दिवस अरबांनी चांगलीच मुसंडी मारत इस्राएलला मागे रेटले. अशा बिकट परिस्थितीत इस्राएलचे संरक्षणमंत्री व माजी सेनानी मोशे दायानही खचून गेले आणि त्यांनी राजीनामा देऊ केला. इस्राएल अशा संकटात असताना आणि दायान सारख्या निधड्या सेनानीनेही हार Read more

अनुवादित

हडप्पा संस्कृती चे वर्षानुवर्षे जपलेले एक रहस्य – रक्तधारेचा अभिशाप

राग, लोभ, इर्ष्या, मत्सर हे मानवी स्वभावाचे महत्वाचे पैलू आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात हे गुण असतातच. पण चांगल्या गुणांपेक्षा ज्यावेळी अवगुण हे जास्त प्रभावी होऊ लागतात त्यावेळी कोणताही मनुष्य सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसतो आणि मग त्याचे आणि त्या समाजाचे अध:पतन निश्चित असते. ई.स पूर्व १७००च्या सुमारास त्याकाळी भारतातील (आणि कदाचित जगातील काही Read more

मराठी पुस्तके

विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम

महाभारत युद्धानंतर तब्बल ३६ वर्षांनंतर कौरवांची माता गांधारीच्या शापाचा परिणाम दिसू लागला. सर्व यादव वंशीय आपापसात लढू लागले आणि परिणामी भगवान श्रीकृष्ण निर्वंश झाले. श्रीकृष्णाची लाडकी नगरी द्वारावती म्हणजे द्वारकेतही अराजक माजले. द्वारकेजवळील समुद्राची लक्षणेही ठीक दिसत नव्हती आणि तो द्वारकेला गिळंकृत करणार हे स्पष्ट दिसू लागले. श्रीकृष्णाचा पृथ्वीतलावरील मानव अवतार संपण्याचे दिवसही जवळ येऊ Read more

अनुवादित

भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास – माझेही एक स्वप्न होते

आतापर्यंत जगातले बहुतांश महत्त्वाचे शोध हे अपघाताने लागल्याचे इतिहासात डोकावून पाहताना आपल्याला समजून येईल. पण एखादी ‘अपघाती घटना’ भारतातील दुग्ध व्यवसायाचा चेहरामोहरा बदलून भारताला दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण बनवून त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यास कारणीभूत ठरली असे सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे पूर्णपणे सत्य आहे. ग्रामीण भारताशी काहीही सोयसुतक नसलेला वर्गीस कुरियन नावाचा Read more

अनुवादित

Your Prime Minister is Dead – लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्युचे रहस्य

‘जय जवान जय किसान’ ची घोषणा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे आकस्मिक निधन झाले. १९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता करार करण्यासाठी ते तत्कालीन सोव्हिएत युनियन मधील ताश्कंद येथे गेले होते. सात दिवस अखंड चाललेल्या वाटाघाटी नंतर अखेर १० जानेवारी रोजी ताश्कंद करारावर भारत आणि Read more