पुस्तके – थोडक्यात परिचय

पुस्तके - थोडक्यात परिचय

अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

हेरगिरीचे विश्व हे जितके रोमांचक तितकेच धोकादायक! आपल्या देशासाठी परकीय मुलुखात हेरगिरी करताना जर पकडले गेले तर कोणतीही मदत न मिळता थेट मृत्यू. हे माहित असूनही हजारो गुप्तहेर आपले जीव धोक्यात घालून देशासाठी काम करत असतात. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा एक अशाच प्रकारचे गुप्तहेर. शत्रू प्रदेशात ओळख लपवून राहत माहिती Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर

मेक्सिको मधील माया लोकांच्या पिरॅमिड मध्ये शिलाखंडावर अग्निबाणातील अंतराळवीर कोरलेला आहे. पेरू देशातील अतिप्राचीन दगडांवर हृदय बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा एक टप्पा दाखवण्यात आला आहे. सुमेरियन लोकांनी अशी एक पंधरा आकडी संख्या लिहून ठेवली आहे जी आजच्या कॉम्प्युटर मध्ये सुद्धा येत नाही. चीन मध्ये भूकंपात सरोवरातून वर आलेल्या पिरॅमिड वर अग्नीबाणांची चित्रे आहेत. इस्टर आयलंड वरील ३३ Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

बर्म्युडा ट्रँगल – आजपर्यंत न उलगडलेले रहस्य

फ्लाईट लीडर (लेफ्टनंट चार्ल्स टेलर) : Calling Tower, this is an emergency. आम्ही बहुधा मार्ग चुकलोय. आम्हाला जमीन दिसत नाही……पुन्हा सांगतो….आम्हाला जमीन दिसत नाही. Tower : तुमच नेमक स्थान काय आहे? फ्लाईट लीडर : आमच्या नेमक्या स्थानाबद्दल आम्हाला काही खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आम्ही कुठे आहोत हेच आम्हाला कळत नाही…..बहुधा आम्ही वाट चुकलोय. Tower : Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

पॅलेस्टाइन – इस्रायल – एका अस्तित्वाचा संघर्ष

१९१६ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान इंग्लंडला ‘ॲसिटोन’ नावाच्या रसायनाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत होती. बंदुकीच्या गोळ्या तसेच इतर दारुगोळ्यामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. फ्रान्स विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी इंग्लंडला ३०००० टन ॲसिटोन ची गरज होती. त्यावेळी ब्रिटिश लष्कराशी संबंधित विभागात काम करणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांनी ही गोष्ट रसायनशास्त्रज्ञ आणि झियोनिस्ट विचारसरणी (ज्यूंचे स्वतंत्र Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

डॉ मनमोहन सिंग – द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर

“मला जो धोका पत्करावा लागणार आहे, याची मला जाणीव आहे. टी टी कृष्णम्माचारी हे एकदा मला म्हणाले होते की ‘दिल्लीच्या रस्त्यांवर वाघ दबा धरुन बसलेले असतात’. मला संभाव्य धोक्याची कल्पना आहे, पण भारताच्या कल्याणासाठी मी तो धोका पत्करण्यास तयार आहे.” स्वतःला अपघाताने झालेला पंतप्रधान मानणाऱ्या डॉ मनमोहन सिंग यांचे हे आत्मविश्वासाने भरलेले उद्गार २००६ मधील Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

भगतसिंगचा खटला – न्यायाच्या हत्येचे कारस्थान

“जर जर्मनीने अथवा रशियाने इंग्लंडवर आक्रमण केले, तर त्या आक्रमकांना हिंसक प्रतिकार करू नका,’ असा उपदेश लॉर्ड आयर्विन (इंग्लंडच्या) जनतेला करणार आहेत का? जर तसे ते करणार नसतील, तर या खटल्याबद्दलही त्यांनी काही उठाठेव करू नये. पण एक गोष्ट मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो – भगतसिंगची विचारसरणी मला पटो वा न पटो, त्याच्यासारख्या माणसाचे अविचल धैर्य Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘मॅन हंट’ – बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा

११ सप्टेंबर २००१ – सकाळची वेळ – कंदाहार (अफगाणिस्तान) ‘आज बातम्या पाहणं खूप महत्त्वाचं आहे’ असे ओसामा बिन लादेन आपल्या अंगरक्षकाला म्हणाला. २९ एप्रिल २०११ – सकाळची वेळ – व्हाइट हाऊस, अमेरिका “मी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि तो ‘होय’ असा आहे”. ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी ‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’ ला ओबामा यांनी संमती दिली. Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘विश्वात आपण एकटेच आहोत काय?

युरोपात दुसऱ्या महायुद्धाची रणधुमाळी चालू असतानाच अमेरिकेतील लॉस ॲलमोस येथील अण्वस्त्र संशोधन केंद्रामध्ये काम करणाऱ्या अनेक नामवंत शास्त्रज्ञांच्या मध्ये अनेकदा गप्पागोष्टी घडत असत. अशाच एका गप्पाष्टकात परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा विषय निघाला. तेव्हा, ‘ते कुठे आहेत?’ असा एक मार्मिक प्रश्न एन्रिको फर्मी या विख्यात शास्त्रज्ञाने उपस्थित केला. मुळात परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचे अस्तित्व संशयास्पद आहे असेच फर्मी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

सोविएत रशियाची KGB

प्राचीन काळातील साम्राज्ये आणि आजच्या काळातील विविध देशांपुढे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते ते म्हणजे आपले अस्तित्व टिकवून प्रगती करत राहणे. आता अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इतर राज्ये आणि देशांसोबत संघर्ष करणे हे ओघाने आलेच. प्रत्येक देश अशा प्रकारच्या संघर्षात वरचढ राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. पण यासाठी गरज असते शत्रूला पूर्णपणे जाणण्याची. Sun Tzu ने सुद्धा म्हटले Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

२४ अकबर रोड – कॉंग्रेसचा स्वातंत्र्यापासूनचा प्रवास

जानेवारी १९७८ ला काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष के ब्रम्हानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींची काँग्रेस मधून हकालपट्टी केली. काँग्रेस पक्षात फूट पडली आणि याचा मोठा तोटा इंदिरा गांधींना झाला. दोन गटांच्या भांडणात निवडणूक आयोगाने काँग्रेसचे तोपर्यंतचे निवडणूक चिन्ह गाय वासरू कायमचे गोठवले आणि बुटासिंग यांना इंदिरा काँग्रेस साठी नव्या चिन्हासाठी हत्ती, सायकल आणि हाताचा पंजा असे तीन Read more