पुस्तके – थोडक्यात परिचय

पुस्तके - थोडक्यात परिचय

बेनझीर भुत्तोंची हत्या – का आणि कशी?

“माझी हत्या करण्यात आली तर तुम्ही मुशर्रफ यांचं नाव मारेकरी म्हणून घेऊ शकता”. आपल्या मृत्यूच्या काही आठवडे आधीच बेनझीर एका पत्रकाराला हे सांगत होत्या. २७ डिसेंबर २००७ रोजी संध्याकाळी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची रावळपिंडी या पाकिस्तानच्या लष्करी दृष्ट्या महत्त्वाच्या शहरात हत्या करण्यात आली. हत्येनंतर केवळ ४८ तासात मुशर्रफ यांनी ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’चा अमीर म्हणजेच Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

डोमेल ते कारगिल – काश्मीरच्या परिस्थितीचे सखोल विश्लेषण

२२ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानने डोमेल या भारतीय चौकीवर दगाफटका आणि फंद फितुरीने कब्जा केला. स्वातंत्र्यानंतर ‘ऑपरेशन गुलमर्ग’ या काश्मीर वर कब्जा मिळवण्याच्या आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानने डोमेल पासून केली. आपले राज्य गमावण्याच्या भीतीने महाराजा हरिसिंग ने जम्मू काश्मीर राज्य भारतात विलिनीकरण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आणि जम्मू काश्मीर भारताचा कायदेशीर आणि अविभाज्य भाग बनला. Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

द टार्गेट – अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील गुप्तहेर पटाची थरारक कथा

दोन देश. एक पश्चिमेकडचा आणि एक पूर्वेकडचा! दोन्ही देशातील अति महत्त्वाच्या व्यक्ती या टार्गेट होत्या. आपापल्या या लक्षाला मारण्यासाठी दोन्ही देश गुप्तपणे कसून तयारी करत होते. हे दोन्ही देश म्हणजे अमेरिका आणि उत्तर कोरिया. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही देश. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याच्या विक्षिप्तपणाच्या गोष्टी तर प्रचलित आहेतच. याच उत्तर Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘कोहजाद’- बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित कादंबरी

मुझे जंग-ए-आजादी का मजा मालूम है बलुचिस्तान पर जुल्म की इंतेहा मालूम है, मुझे जिंदगी भर पाकिस्तान मे जीने की दुआ ना दो, मुझे पाकिस्तान में इन साठ साल जीने की सजा मालूम है पाकिस्तानात जबरदस्तीने सामील झालेल्या बलुचिस्तान मधील प्रत्येक नागरिकाची ही व्यथा आहे. पाकिस्तानी सरकारचा दुजाभाव आणि पाकिस्तानी लष्कर करत असलेला अनन्वित अत्याचार Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

आगळेवेगळे प्रवासवर्णन – ‘केल्याने देशाटन’

प्रवास करायला जवळपास सर्वांनाच आवडते तसेच प्रवास वर्णन पर पुस्तके वाचायला सुद्धा. मराठीमध्ये सुद्धा अनेक लेखकांनी आपल्या प्रवास वर्णनाची पुस्तके लिहून ठेवलेली आहेत. पण या सर्वांपेक्षा हटके आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्री चंद्रशेखर टिळक यांनी त्यांनी केलेल्या विविध ठिकाणच्या प्रवासांचे वर्णन आपल्या ‘केल्याने देशाटन’ या पुस्तकात केले आहे. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने श्री चंद्रशेखर टिळक हे महिन्यातील Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

कोण होते सिंधू लोक?

कोण होते सिंधू लोक? सिंधू लोकं कोण होते? सिंधू लोकं हेच आर्य होते का? १९२०-२१ दरम्यान हडप्पा आणि मोहोंजोदारो यांच्या उत्खननातून सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यापासून या वरील प्रश्नांचे नेमके उत्तर आजपर्यंत सापडलेले नाही. सिंधू संस्कृती वैभवशाली आणि अत्यंत प्रगत होती यात शंकाच नाही. पण मग तिचा नाश का व कसा झाला? त्याला आर्य जबाबदार होते Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे थोडक्यात जीवनचरित्र

‘लोकांनी घातलेला बहिष्कार अण्णांनी स्थितप्रज्ञ वृत्तीने सहन केला. बंदुकीची गोळी कापसाच्या गठडीवर मारली, तर तिची तीव्रता कमी होते. अण्णा त्यावेळी कापूस झाले होते’ ‘एक व्यक्ती आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त जे करू शकेल त्याहून अधिक कार्य कर्वे यांनी केले आहे.’ ‘भारताच्या पंतप्रधानांसमोर संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करून अण्णांनी आपल्या १०० वर्षांच्या जीवन मंदिरावर सुवर्ण कळसच चढवला आहे.’ Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सह्याद्रीतील घाट वाटांची माहिती देणारे पुस्तक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाने पवित्र झालेल्या महाराष्ट्राच्या भूमी साठी सह्याद्री एकप्रकारे वरदानच आहे. याच सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उभे असलेल्या असंख्य गड किल्ल्यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य असे हिंदवी स्वराज्य उभे केले. पण या गड किल्ल्यांसोबतच महत्त्वाच्या होत्या त्या म्हणजे सह्याद्री मधील अनेक घाट वाटा. प्राचीन काळापासून महत्व लाभलेल्या या घाट वाटा घाटमाथ्याला कोकणाशी जोडत. Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘शिवनेत्र बहिर्जी’- स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्यावर आधारित कादंबरी

कोणत्याही लढाई मध्ये डावपेच हे फार महत्त्वाचे असतात. डावपेच योग्य असतील तर कमी सैन्य वापरूनही बलाढ्य शत्रूला धूळ चारता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध सैन्य मोहिमांमध्ये नेहमीच हे दाखवून दिले. पण हे डावपेच रचण्यासाठी चालून येणाऱ्या शत्रुची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक असते. यामुळेच शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मजबूत आणि कार्यक्षम असे गुप्तहेर खाते निर्माण केले Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

आदिपर्व – छत्रपती मालोजी राजांचा जीवनप्रवास

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामागे पराक्रमाचा फार मोठा वारसा त्यांना मिळाला होता. त्यांचे पिता शहाजी राजे आणि त्यांचे आजोबा मालोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाने आपला काळ गाजवला होता. याच मालोजी राजांचा जीवनप्रवास कादंबरीच्या रूपाने ‘आदिपर्व’ या पुस्तकात डॉ प्रमिला जरग यांनी शब्दबद्ध केला आहे.वेरूळच्या बाबाजी राजे भोसले यांचे थोरले पुत्र असलेले मालोजी Read more