अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

हेरगिरीचे विश्व हे जितके रोमांचक तितकेच धोकादायक! आपल्या देशासाठी परकीय मुलुखात हेरगिरी करताना जर पकडले गेले तर कोणतीही मदत न मिळता थेट मृत्यू. हे माहित असूनही हजारो गुप्तहेर आपले जीव धोक्यात घालून देशासाठी काम करत असतात. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा एक अशाच प्रकारचे गुप्तहेर. शत्रू प्रदेशात ओळख लपवून राहत माहिती मिळवणे ही डोवाल यांची खासियत. ईशान्य भारतातील मिझो बंडखोरांमध्ये राहून त्यांनी त्यांच्या चळवळीत फूट पाडली आणि कालांतराने मिझो बंडखोरी संपुष्टात आली. पाकिस्तानमध्ये ते तब्बल सात वर्षे राहिले आणि भरपूर अशी महत्त्वाची माहिती त्यांनी मिळवली.

१९८४ प्रमाणेच १९८८ मध्ये सुवर्णमंदिरात पुन्हा अतिरेकी घुसले होते. त्यावेळी अजित डोवाल पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISIचा अधिकारी म्हणून सुवर्ण मंदिरात घुसले आणि अतिरेक्यांच्या मानसिकतेशी खेळू लागले. परिणामी रक्ताचा एकही थेंब न सांडता ही कारवाई फत्ते झाली.

अशाच प्रकारचे प्रयत्न त्यांनी १९९९ मध्ये झालेल्या कंदाहार अपहरणावेळी सुद्धा केले पण त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. भारताला तीन अतिरेक्यांना सोडावे लागले.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमले. उरी येथे भारतीय लष्कराच्या छावणीवर झालेला हल्ला आणि पुलावामा येथील CRPF जवानांवरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेले आक्रमक प्रत्युत्तर यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांचे महत्त्वाचे योगदान होते.

एक पोलिस अधिकारी ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेल्या अजित डोवाल नावाच्या एका गुप्तहेराची चित्तथरारक कहाणी अविनाश थोरात यांनी त्यांच्या ‘अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ या छोटेखानी पुस्तकात दिली आहे.

आवर्जून वाचावे असे पुस्तक

पुस्तकाचे नाव – ‘अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’

लेखक – अविनाश थोरात

पब्लिकेशन्स – विश्वकर्मा पब्लिकेशन .

अजित डोवाल
अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

पुस्तक विकत घेण्यासाठी खाली click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *