सियालकोट गाथा – लहानपणी ताटातूट झालेल्या दोन भावांची कहाणी

सियालकोट गाथा आहे अरविंद आणि अरबाज या दोन व्यक्तींची ! कलकत्त्यात एका मारवाडी व्यापारी सुखवस्तू कुटुंबातील अरविंद आणि मुंबई मधील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील अरबाज तसे एकमेकांपासून जवळपास २००० किमी अंतरावर आपले जीवन व्यतीत करत होते. पण नियतीने त्यांना वारंवार एकमेकांसमोर उभे केले. इतिहासातील अनेक मुख्य घटनांशी बेमालूमपणे आपले हे कथानक जोडून आश्विन सांघी यांनी ‘सियालकोट गाथा‘ हे कथानक उभे केले.

भारताच्या प्राचीन इतिहासातील सम्राट अशोकने आपल्या नऊ विश्वासू व्यक्तींना एक रहस्य जपण्यासाठी दिले. मनुष्य अमर कसा होऊ शकतो याबाबत ते रहस्य होते. वर्षानुवर्षे ते रहस्य काटेकोरपणे जपले गेले. याच कडीतील शेवटची व्यक्ती होती एक शीख व्यक्ती ज्याची फाळणीनंतर झालेल्या हिंसेमध्ये हत्या करण्यात आली होती. पण त्याच्या पत्नीने ते अशोक कालीन रहस्य जपून ठेवले. पण दुर्दैवाने आपल्या दोन्ही मुलांना सियालकोट मध्ये अमृतसरला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसवताना ती मात्र मागेच राहिली. सुदैवाने ही दोन्ही मुले अमृतसरला सुखरूप पोचली पण त्यांची यानंतर कायमची ताटातूट झाली. एकाला बंगाली मारवाडी कुटुंबाने दत्तक घेतले आणि दुसऱ्याला मुंबई मध्ये मुस्लिम कुटुंबाने सांभाळले. तेच हे अरविंद आणि अरबाज. त्यांना शेवटपर्यंत आपल्या या नात्याबद्दल समजले नाही.

दोघेही आपापल्या शहरात वेगाने प्रगती करत होते. अरविंदला आर्थिक बाबतीत चांगले ज्ञान होते आणि जात्याच व्यापाराचा मुलगा असल्याने तो अत्यंत हुशार आणि धूर्त होता. त्याचे वडील हे कलकत्त्यातील फार मोठे व्यापारी नव्हते पण अरविंदने मात्र स्वतःला कोणत्याही बंधनात न अडकवता प्रचंड असे यश मिळवावे अशी त्यांची इच्छा होती. अरविंदनेही साम दाम दंड भेद इत्यादी सर्व प्रकार वापरून प्रचंड पैसा कमावला. आपल्या अक्कल हुशारीने अनेकांना त्याने गंडा घातला. आपण श्रीमंत लोकांच्या यादीत पहिल्या दहात स्थान मिळवावे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती.

दुसरीकडे अरबाज मात्र गरीब कुटुंबात वाढला. त्याचे वडील अयुब बंदरावर मजूर म्हणून काम करायचे. पण आयुष्यभर ते नेहमी प्रामाणिक राहिले. पण त्यांच्या अकाली मृत्यूनंतर अरबाज ने मात्र दुसरा रस्ता पकडला. सुरुवातीला वडिलांच्या जागी काम करणारा अरबाज नंतर मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील अब्दुल दादाकडे काम करू लागला. अत्यंत हुशार डोकं असलेला अरबाज अल्पावधीतच अब्दुल दादाचा उजवा हात बनला. पण अब्दुल दादा आणि अरबाज यांची प्रतिमा ‘रॉबिनहूड‘ सारखी होती. त्यामुळे ते तिथल्या समाजात अत्यंत प्रिय होते.

आपापल्या महत्त्वाकांक्षाचा पाठलाग करणारे दोघे अनेकवेळा एकमेकांसमोर आले. पण त्यांच्यामध्ये अखेरपर्यंत शत्रुत्व राहिले. ते नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करत राहिले.

मध्ये वाचताना पुस्तक बरेच कंटाळवाणे वाटते.

तरीही एकदा वाचावे असे पुस्तक

पुस्तकाचे नाव – सियालकोट गाथा

लेखक – अश्विन सांघी

अनुवाद – तृप्ती कुलकर्णी

पब्लिकेशन्स – वेस्टलँड पब्लिकेशन .

आश्विन सांघी यांचे सियालकोट गाथा
सियालकोट गाथा

हे पुस्तक विकत घेण्यासाठी खाली click करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *