२२ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानने डोमेल या भारतीय चौकीवर दगाफटका आणि फंद फितुरीने कब्जा केला. स्वातंत्र्यानंतर ‘ऑपरेशन गुलमर्ग’ या काश्मीर वर कब्जा मिळवण्याच्या आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानने डोमेल पासून केली. आपले राज्य गमावण्याच्या भीतीने महाराजा हरिसिंग ने जम्मू काश्मीर राज्य भारतात विलिनीकरण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आणि जम्मू काश्मीर भारताचा कायदेशीर आणि अविभाज्य भाग बनला. याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय सेनेने या युद्धात भाग घेतला आणि पाकिस्तानी सैन्याला उखडून टाकले. पण ही लढाई पूर्ण होण्याआधीच युद्धबंदी झाली आणि डोमेल पाकिस्तानातच राहिले.
डोमेल पासून सुरू झालेला हा संघर्ष १९९९ मध्ये कारगिल पर्यंत येईपर्यंत भरपूर बदल घडून आले. भारत – पाकिस्तान मध्ये युद्धे झाली, काश्मीरचे सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे प्रयत्न झाले आणि अखेर दहशतवादाचे छुपे युद्ध खेळायला पाकिस्तानने सुरुवात केली.
डोमेल ते कारगिल या दीर्घ काळातील संघर्ष, लहानमोठ्या मोहिमा, प्रतिकूल निसर्गावर मात करणाऱ्या जिद्दी सैनिकांचा पराक्रम, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनीतिक हालचालींचे बदलते रंग याचे तपशीलवार विवेचन या पुस्तकात आहे. तसेच पाकिस्तानी दहशतवादाचे मर्मभेदी विश्लेषण पण या पुस्तकात आहे.
आज कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी लिहिलेले हे पुस्तक नक्की वाचावे असे.
पुस्तकाचे नाव – डोमेल ते कारगिल
लेखक – मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त)
पब्लिकेशन्स – राजहंस प्रकाशन