पेशवाई – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याला आणखी बळकटी आणली. पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर आणि मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे यांची सुटका केल्यानंतर स्वराज्याचा खरा वारसदार कोण यासाठी महाराणी ताराबाई आणि शाहू राजे यांच्यात संघर्ष सुरू झाला. याचीच परिणती अखेर स्वराज्याची सातारा आणि कोल्हापूर मध्ये विभागणी होण्यात झाली.

स्वराज्य असे स्वकियांच्या संघर्षात अडकले असताना आणि शत्रू याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असताना पेशवाईची सुरुवात झाली आणि त्यांनी आपल्या पराक्रमाने सिंधू नदीच्या पैलतीरापासून ते कावेरीच्या दक्षिण तीरा पर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. अगदी अटकेपार मराठा साम्राज्याचा झेंडा रोवून शत्रूला धडकी भरवली.

पेशव्यांच्या याच पराक्रमाची गाथा म्हणजे कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिलेले ‘पेशवाई’ हे पुस्तक. आवर्जून वाचावे असे.

पुस्तकाचे नाव – ‘पेशवाई’

लेखक – कौस्तुभ कस्तुरे

पब्लिकेशन्स – राफ्टर पब्लिकेशन .

पेशवाई
पेशवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *